आक्षेपाच्या सुनावणीकडे सेलू तालुक्याचे लक्ष
आक्षेपाच्या सुनावणीकडे सेलू तालुक्याचे लक्ष
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सूरज शहाणे,सेलू : सेलू तालुक्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या हादगाव खु गटात समावेश केलेल्या तीन गावातील ग्रामस्थांनी जिल्हाअधिकारी आचल गोयल यांच्याकडे 8जूनला आक्षेप दाखल केला आहे.या आक्षेपाच्या सुनावणीकडे आता लक्ष लागले आहे.
सेलू तालुक्यातील देवगावचा समावेश हा बोरकिनी गण व चिकलठाणा बु गटात होता तर नागठाणा व कुंभारी या गावाचा समावेश वालूर गटात होता परंतू आता पुणर्रचित प्रक्रीयेत या तीन गावाचं समावेश 35किलोमीटर वर असलेल्या हादगाव खु गटात केला आहे.जो कोणत्याही निकषात न बसता भोगोलिक दृष्ट्या गैरसोईचा आहे.त्यामुळे या तीन गावाचा समावेश पूर्वीच्या गट व गणात करावा.
हादगाव खु गटात हि गावे ठेवण्यास देवगाव येथील सरपंच जिजाबाई सोन्ने उपसरपंच चंद्रकला सातपुते,ग्रामपंचायत सदस्य राधा साळेगावकर, गमफूबाई चव्हाण,चेअरमण बाबूअप्पा साळेगावकर,रामेश्वर बहिरट, भगवान सातपुते,पंडित मोरे,रमेश गोरे यांच्यासह ग्रामस्थांनी 8जूनला जिल्हाधिकारी गोयल यांच्या कडे आक्षेप दाखल केला.तर नागठाणा व कुंभारी येथील ग्रामस्थांनी या प्रकरणी आक्षेप दाखल केला आहे.या आक्षेपावर जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते. याकडे तिन्ही गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत