नागाळा ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकला
नागाळा (सि.) ग्रामपंचायत पोट निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : नागाळा (सि.) ग्रामपंचायत पोट निवडणुकीत शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे दिग्गज नेते गावात तड ठोकून असताना सुद्धा धनशक्ती भाजप विरुद्ध जनशक्तीने शिवसेनेच्या उमेदवारांना कौल देत ग्रामपंचायत निवडणुकीत भगवा फडकला.
चंद्रपूर तालुक्यातील नागाळा गट ग्रामपंचायत येथील सरपंचासह दोन सदस्यांना सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्र करण्यात आले होते. त्याची पोट निवडणूक ५ जून ला पार पडली. ही पोट निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. अनेक दिग्गज भाजप नेते गावात सभा, बैठका घेत होते. काही स्थानिक नेते तर गावात तड ठोकून होते. दुसरीकडे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका सौ उज्वला प्रमोद नलगे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली.
ग्रामपंचायत नागाळा (सी.) वॉर्ड न. ४ मधून शिवसेनेचे उमेदवार सौ संगीता माणिकचंद थोरात, श्रीमती शोभा भीमराव चीमुरकर ह्या रिंगणात होत्या. ५ जून रोजी निवडणूक पार पडली. याचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यात शिवसेनेच्या उमेदवार संगीता थोरात यांना ३६६ तर विरोधी गटाच्या प्रियंका करमनकर यांना ३०६ मते आणि शिवसेनेच्या शोभा चिमूरकर यांना ३९५ तर शोभा डोर्लिकर ५४, सलमा शेख यांना २२० मते मिळाली. यात शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी दणदणीत विजय संपादन करीत ग्राम पंचायतवर भगवा फडकवला. धनशक्ती भाजपाला डावलत जनशक्तीने शिवसेनेच्या बाजूने कौल दिला.
शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका उज्वला प्रमोद नलगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तालुका समन्वयक विकास विरुटकर, आतिश चिमुरकर, एकनाथ देवतळे यांच्या सहकार्याने शिवसेना, महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेत हा विजय संपादन केला. विजयानंतर नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत