चक्क बाजाराच्या दिवशी पोलीस चौकी बंद, चोरांनी अख्या बाजारात घातला धुमाकूळ
चक्क बाजाराच्या दिवशी पोलीस चौकी बंद, चोरांनी अख्या बाजारात घातला धुमाकूळ
आता सर्व सामान्यांनी तक्रार द्यायची कोणाकडे
झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग येईल तरी केव्हा
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,सुरज शहाणे,सेलू : दि. 8/ 6/2022 वार बुधवार या दिवशी वालुर ता.सेलू येथे आठवडी बाजार आहे,वालुर सह ग्रामीण भागातून खेड्यातील जवळपास 15 ते 20 गावातून शेतकरी कामगार सर्व सामान्य लोक बाजारात येत आसतात, पण यावेळी काही भलतेच कृत्य या बाजारात चालू होते,आज वालुर बाजार येथे चोरांचा सुळ सुळाट पैसे चोरिला गेले मोबाईल फोन चोरिला गेले.
हि गंभीर बाब लोकांच्या लक्षात येताच(आपले मोबाईल,पैसे चोरीला गेले आहेत) त्यांनी थेट पोलीस चौकी गाठली, वालुर पोलीस चौकीमध्ये तक्रार देण्याकरता गेले असता,बाजाराच्या दिवशी पोलीस चौकीला चक्क ताला पाहून तक्रारकर्ते हैराण झाले, त्या ठिकाणी कोणतेही पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित नाहीत, त्यापैकी दोन शेतकरी सदर प्रतिनिधीकडे जाऊन आपली व्यथा ऐकवताच त्यांनी PSI गाडेवार यांच्याशी संपर्क साधला असता,ते आजारी असून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असल्याचे मीहिती मिळाली.
अश्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेने अपेक्षा ठेवायची तरी कुणाकडे,वालुर या ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकी असूनही तिथे जर प्रशासनाचा एकही पोलीस कर्मचारी जर उपस्थित राहणार नसेल,तर या चौकी चा उपयोग काय, फक्त मला पहा आणि फुले वाहा या म्हणी सारखे हे दृश्य, गरज नसताना सर्व एकाच ठीकानी बसले असतात खुर्च्या तोडत आणि खरच गरज असते त्या दिवशी मात्र सर्व कर्मचारीच गायब, खरतर यांना काम करण्याची ईच्छाच नाही, फक्त या खाकि वर्दीचा गैर फायदा,वसुली कशी करता येईल कोणाकडून कसे पैसे काढता येईल,कुनाला कसे फसविता येईल, यात यांचे लक्ष वेधले असते, कुठे या चोरांशी पोलीस कर्मचाऱ्याचे साठगाठ तर नसेल ना... अशी चर्चा संपूर्ण बाजारात चालू असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली.
तक्रार नोंद देण्यासाठी सिताराम तुकाराम धापसे, दीपक राधाकिसन रोकडे वालुर येथील शेतकरी आहेत, या दोन्ही शेतकऱ्यांची अँड्रॉइड मोबाइल चोरीला गेले आहे, आणि सदर चौकीत एकही कर्मचारी नाही हि खरच लाजिरवाणी बाब आहे, वालुर बाजारपेठ वालूर सह पंधरा ते वीस गाव या बाजारामध्ये येत असताना या ठिकाणी पोलीस चौकी असून एकही पोलीस प्रशासनाचा कर्मचारी हजर नाही सर्वसामान्य बाजारात खेड्यापाड्यातून येणारे शेतकरी सर्वसामान्य कामगार मजूर यांना या ठिकाणी संरक्षण मिळत नाही,आम्ही नेमकी अपेक्षा ठेवायची तरी कुणाकडे, वेळकाढू पणा करणारे प्रशासन कधीतरी गोरगरिबांच्या कामी पडेल काय ? मी या गोष्टीचा निषेध करतो. : दगडोबा जोगदंड पाटील, तालुका अध्यक्ष,भाजपा किसान मोर्चा,सेलू



कोणत्याही टिप्पण्या नाहीत