आरोग्य केंद्राअंतर्गत कर्मचाऱ्यांचे वेतन थकले
आरोग्य केंद्राअंतर्गत कर्मचाऱ्यांचे वेतन थकले
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी सूरज शहाणे परभणी : परभणी जिल्हापरिषदेतर्गत सहा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यन्वित कर्मचाऱ्यांचे आरोग्य विभागाने गेल्या पाच तें सहा महिन्यापासून वेतन थकविले आहे.
या जिल्ह्यात 6 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर त्या केंद्राना आजतागायत कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याकरिता मंजुरी नसतानासुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाणे एलएच व्ही व एच ए या कर्मचाऱ्यांच्या बदल्या डिसेंबर 2021व जानेवारी 2022पासून केल्या परंतु त्या आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना तेव्हापासून आजपर्यंत वेतनच वितरित केले नाही.या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठानंशी वारवार संपर्क साधला. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या तीन तें चार वेळा भेटी घेऊन माहिती निदर्शनास आणून दिली.
परंतु उडवा उडवी शिवाय या कर्मचाऱ्यांना काहीही हाती आले नाही. त्यामुळेच बनवस, दिग्रस,शेळगांव, चिकलठाणा बु येरंडेश्वेर आर्वी येथील आरोग्य केंद्रातील संतप्त कर्मचाऱ्यांनि तीर्व खंत व्यक्त केली.एलआयसी कर्ज किंवा अन्य हप्ते थकले आहेत.वारंवार मागणी करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्यदल या कर्मचाऱ्यांनि संताप व्यक्त केला.या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने आत्महत्येची वेळ येऊ देऊ नये.असाही इशारा संतप्त कर्मचाऱ्यांनि दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत