महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सूरज शहाणे, परभणी : पूर्णा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंता संतोष गंगाराम गुंजिटे यांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाणे गुरुवारी 2मे 2022 रोजी दोन हजार रुपयाची लाच स्वीकारतेवेळी ताब्यात घेतले.
पूर्णा तालुक्यातील एका तक्रारत्याने भावाच्या शेतात सौर ऊर्जा पम्प मंजूर झाल्याने पूर्णा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडून शेतात विदयुत जोडणी नसल्याचे प्रमाणपत्र मागितले.तेव्हा संबधीत अभियत्याने तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली.गुरुवारी तडजोडी अंती दोन हजार रुपये घेऊन ये असे म्हटले तेव्हा लाचलुचपत पथकाणे कनिष्ठ अभियंता संतोष गुंजिटे यांना 2हजार रुपयाची लाच स्वीकारतेवेळी ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे व अपर पोलीस अधीक्षक धरमसींग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे पोलीस निरीक्षक बसवेश्वर जक्कीकोरे पोलीसहवालदार नीलपत्रेवार पोलीस नाईक कटारे पोलीस शिपाई कदम आदींनी पंचासमक्ष या कनिष्ठ अभियंत्यास ताब्यात घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत