Breaking News

ब्राह्मणगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

ब्राह्मणगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी सूरज शहाणे, सेलू : सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव पी पी येथे मराठा साम्राज्याची 28 वर्ष पताका चालवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंतीचे आयोजन दिनांक 8 जून 2022 बुधवार रोजी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुंडलिक डोईफोडे, महादेव बनसोडे यांनी केले होते. 

जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष रामप्रसाद डोईफोडे माजी सरपंच ब्राह्मणगाव हे लाभले होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक आनंद डोईफोडे उपसभापती पंचायत समिती तथा पंचायत समिती सदस्य मोरेगाव हे लाभले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. प्रा. विठ्ठल वजीर सर हे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. पंडित जगाडे सर, सरपंच साधना डोईफोडे, पोलीस पाटील विष्णू रामटेके, संतोष डोईफोडे, सुभाष शेळके सर, अन्नपूर्णा बनसोडे, प्रभाकर बोबडे, कचरूबा बोबडे, गणेशजी बोबडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्ता काळदाते, ग्रामपंचायत सदस्य अशोक डोईफोडे, प्रल्हाद काळदाते, कुंडलिक शेळके, विनोद काळदाते, अर्जुन काळदाते, मुंजा डोईफोडे, शिवाजी डोईफोडे, अनिल डोईफोडे, केशव डोईफोडे, गणेश डोईफोडे, जनार्दन डोईफोडे, दत्ता जामकर, नवनाथ डोईफोडे, अर्जुन पारधी, ज्ञानेश्वर काळदाते, लखन कांबळे, अशोक डोईफोडे, ज्ञानेश्वर गायके, सोपान डोईफोडे, गौतम कांबळे, पंडीत कांबळे, शाळीग्राम डोईफोडे, विष्णू धनवे, श्रीरंग कांबळे, किरण कांबळे, ज्ञानेश्वर डोईफोडे, दिपक शिंनगारे आदींसह असंख्य गावकरी मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव गायके यांनी केले तर आभार प्रदर्शन सौरभ डोईफोडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत