Breaking News

डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर रावेर येथील स्त्रियांच्या शौचालयांना दरवाजेच नाही घृणास्पद आणि लज्जास्पद प्रकार

 वृत्तांकन मालिका नंबर 3

ठेकेदार ठाकूर आणि रावेर नगर पालिका प्रशासनाने विकली लाज

डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर रावेर व महात्मा फुले कॉम्प्लेक्स रावेर येथील शौचालय अजूनही दयनीय अवस्थेत

पैसे खर्च करून सुद्धा शौचालय साफसफाई रावेर शहरात नाही

रावेर शहरात का होतेय जाणूनबुजून दुर्लक्ष

डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर रावेर येथील स्त्रियांच्या शौचालयांना दरवाजेच नाही घृणास्पद आणि लज्जास्पद प्रकार

 ठाकूर नामक ठेकेदाराचा ठेका व बिल रद्द करण्याची जनतेची मागणी

महा घडामोडी जिल्हा प्रतिनिधी दिपक तायडे जळगाव :- रावेर येथिल शौचालयांचा विषय दिवसेंदिवस गाजत आहे .येथिल शौचालयाचा ठेका हा ठाकूर नामक व्यक्ती कडे असून तो फक्त पेमेंट घेण्यासाठी रावेर नगर पालिकेत येत असतो त्यास साफसफाई च्या बाबत विचारणा केली असता तो असे सांगतो की :मै आदमी रखा हु वो देखता है उधर का काम ,सफाई हो रही है आणि कधीही साफसफाई नसते उलट नागरिक या प्रकाराने कंटाळून वैतागले आहेत. ठेका घेतल्यानंतर हे महाभाग लक्ष देत नाहीत त्यामुळे नागरिकांना समस्यांचा पाढा नगर पालिकेत वाजवावा लागतो परंतु कुंभकरणी झोपेचे सोंग घेतलेले अधिकारी प्रशासन झोपेतून उठतील तर नवलच आहे.

   सर्वात कठीण परिस्थिती डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महिलांच्या शौचालयाची आहे त्यांना दरवाजेच नाहीत आणि विशेष बाब अशी आहे की रावेर शहराला सर्व प्रशासकीय अधिकारी या जवळपास ९९%या महिलाच आहेत परंतु मुख्याधिकारी मॅडम या भागाकडे चुकूनही फिरकायला तयार नाहीत. कमीत कमी दरवाजे तर चांगले बसवा अनेक स्त्री नागरिक या अश्या भिबत्स्य प्रकाराने भयानक वैतागलेल्या आहेत. एकीकडे आपण महिला डे साजरा करतो आणि महिला सक्षमीकरणाच्या गप्पा ठोकतो आणि महिलांच्या अश्या समस्यावर काम का करत नाही हा मोठा प्रश्न आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील शौचालयांची परिस्थिती कधी बदलेल कधी इथल्या महिलांना नागरिकांना न्याय मिळेल हा मुद्दा गुलदस्त्यात खितपडत आहे.

   रावेर येथील महात्मा फुले कॉम्प्लेक्स च्या लेडीज टॉयलेट्स सुद्धा अतिशय वाईट परिस्थितीत आहेत येथील महिला नेहमीच या ठेकेदाराच्या अशा कृती मूळ नाराज आहेत त्याच बरोबर हैराण झाले आहेत कारण साफसफाई च्या नावावर गोरख धंदा ठेकेदार ठाकूर करीत आहे, ज्या कामाचे पैसे या ठेकेदारास न पा रावेर पुरवीत आहे ते काम व्यवस्थित होते आहे की नाही या गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

   तरी जनतेची मागणी अशी आहे की संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला न केलेल्या कामाचे बिल पेमेंट अदा करू नये आणि लवकरात लवकर शौचालयाची साफसफाई व नसलेले दरवाजे लावण्यात यावे अशी नागरिकांची रास्त मागणी आहे, अपेक्षा एकच की आतातरी नगर परिषद रावेर लक्ष देईल याकडे रावेरकरांचे लक्ष लागले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत