Breaking News

बोदवड नाभिक समाज बांधवांकडून तहसीलदार यांना निषेध निवेदन देण्यात आले

बोदवड नाभिक समाज बांधवांकडून तहसीलदार यांना निषेध निवेदन देण्यात आले


महा घडामोडी न्युज नेटवर्क जळगाव : दि.०६ मार्च २०२२रोजी जालना येथील एका सभेत भाजपचे केंद्रीय राज्यरेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका करतांना नाभिक समाजाविषयी अपमानजनक विधान केले.याचा निषेध बोदवड तालुक्यातील नाभिक बांधवांकडून करण्यात आला आहे.तिरुपती बालाजी मंदिरातील न्हावी हे भक्तांचे डोक्यावरचे केस काढतांना त्यांना ताटकळत ठेवतात याप्रमाणे नाभिक समाजाविषयी विधान करून भावना भडकविण्याचे काम दानवे यांनी केले.

नाभिक बांधवांच्या व्यवसायाविषयी वाईट बोलल्याने नाभिक बांधव संतप्त झाले असून रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांचे विरोधात आंदोलन करावे लागेल अशी नाभिक बांधवांची भूमिका आहे.राज्य सरकारने सदर प्रकरणात रावसाहेब दानवे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर निवेदनाच्या प्रती मा.मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी जळगाव यांना तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले आहे. निवेदन देतांना नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष विवेक वखरे,दुकानदार संघटनेचे शहर अध्यक्ष गणेश सोनोने,जिल्हा कर्मचारी कार्याध्यक्ष संजय वाघ,संतोष कुंवर,अमोल आमोदकर,संतोष वसाने,योगेश वखरे हे नाभिक बांधव उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत