सिध्दू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित सौरभ महाकाळला पुणे पोलीसांकडून अटक
सिध्दू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित सौरभ महाकाळला पुणे पोलीसांकडून अटक
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी अविनाश मुंढे,पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याप्रकरणात पुण्यातील ज्या युवकाचे नाव समोर आले होते, त्या युवकाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ महाकाळ असे या युवकाचे नाव आहे.
ओंकार उर्फ राण्या बानखेले खून प्रकरणातील आरोपी संतोष जाधव याला आश्रय देणारा सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात सिद्धू मुसेवालाच्या हत्येशी सौरभचा संबंध आहे किंवा नाही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
सौरभ महाकाळ या प्रकरणात संशयित असल्याचे पंजाब पोलिसांनी म्हटले आहे.पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात 29 मे 2022 रोजी सायंकाळी जवाहरके गावात झालेल्या हल्ल्यामध्ये मुसेवालांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पंजाब पोलिसांनी संशयितांची यादी जाहीर केली होती. यामध्ये पुण्याच्या संतोष जाधव आणि सौरव महाकाळ यांची नावे समोर आली होती.
मुसेवालांवर गोळ्या झाडणाऱ्या आठ जणांपैकी दोघे जण पुण्याचे असल्याचे पंजाब पोलिसांनी म्हटले होते.संतोष जाधव आणि सौरव महाकाळ हे विविध गुन्ह्यासाठी वाँटेड असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी दिली होती. पण त्यांनी तेव्हा स्पष्ट केले होते की पुण्यातले हे आरोपी सिद्धू मुसेवालाच्या प्रकरणात सहभागी आहेत की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत