Breaking News

भारत सरकारने सुरू केलेली अग्नीपथ योजना बंद करा

 भारत सरकारने सुरू केलेली अग्नीपथ योजना बंद करा

अर्जुनी-मोर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसिलदारामार्फत माननीय राष्ट्रपती यांना निवेदन

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी संतोष रोकडे,अर्जुनी-मोर : भारतीय सैन्य दलाच्या भरती प्रक्रिये करीता भारत सरकारने सुरू केलेली अग्निपथ योजना बंद करण्याची मागणी अर्जुनी मोर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अर्जुनी-मोर तहसीलदार यांना निवेदन देऊन माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांना दिनांक 27 जून रोजी लेखी निवेदनाद्वारे केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारत सरकारने भारतीय सैन्य दला करिता भरती प्रक्रियेत बदल करून नव्याने अग्निपथ योजना सुरू करून या योजनेअंतर्गत 17 ते 23 वयोगटातील उमेदवारांना घेऊन त्यांचा फक्त चार वर्षाकरिता कार्यकाळ राहणार आहे.

 त्यानंतर त्यांना दहा लाख रुपये देऊन पदममुक्त करणार आहे या अनुषंगाने या भरती प्रक्रियेत सहभागी होणारे युवकांचे भवितव्य अंधकारमय आहे उमेदवारांची वय ही उमेदीची असून त्यांच्या आवडीनुसार उच्च शिक्षण घेण्याचे व आपले स्वप्न साकार करण्याचे असते परंतु त्याच वयात त्यांना सैन्यात भरती होण्याचे आव्हान करून दहा लाख रुपयाचे गाजर दाखविणे म्हणजे या देशातील सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा धोरण आहे तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे या अग्नीपथ योजनेमुळे भारतीय सेनेचा अनादर होणार आहे.

 तरुणांच्या उमेदीच्या काळात या योजनेअंतर्गत चार वर्षात पदमुक्त करणार म्हणजे युवक लग्न करणं पूर्वीच पदमुक्त झालेला असेल मग त्याचे वैवाहिक जीवन कसे होईल अग्नीपथ योजना आणण्यामागे भारत सरकारचा मोठा कटकारस्थान आहे तसेच या योजनेमुळे भारताच्या सुरक्षेबाबत प्रत्येकाच्या मनात शंका घर करीत आहे त्यामुळे अग्नीपथ योजनेचा तालुका काँग्रेस कमिटी निषेध करीत असून भारत सरकारने अग्नीपथ योजना ताबडतोब मागे घ्यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष भागवत नाकाडे इंद्र दास झिलपे अनिल दहिवले पंचायत समिती सदस्य घनश्याम घामट पंचायत समिती सदस्य बागेश्वरी सयाम व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत