आर्य अबॅकस ऍण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात संपन्न
आर्य अबॅकस ऍण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात संपन्न
महा घडामोडी न्युज नेटवर्क, सांगली : येथील कवलापूरमधील सिद्धेश्वर सभागृहात आर्य अबॅकस ऍण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धा ४ ते ६, ७ ते १०, ११ ते १४ आशा तीन गटामध्ये घेण्यात आल्या. यामध्ये सांगली जिल्ह्यामधून ४० गावातील साधारण ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत बौद्धिक सचोटीने ही स्पर्धा पार पडली. यावेळी कवलापूर, बुधगाव,बिसुर गावातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
अबॅकस आणि वेदिक मॅथ्स याचा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, स्मरणशक्ती, अभ्यासातील गती व अचूकता वाढवण्यासाठी उपयोग होतो. भविष्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परिक्षांच्या पायाभरणीसाठी याची चांगलीच मदत होते, असे मत आर्य अबॅकस ऍण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक संकपाळ यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे स्वप्नील हिरुगडे( वित्त लेखा अधिकारी), हसीना शेख (तीन राज्याच्या आदर्श मुख्याध्यापीका ), इनयात तेरदाळकर(इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन चे राज्य पंच) भानुदास पाटील (अध्यक्ष तंटा मुक्ती ), संदीप पाटील (आदर्श शिक्षक), स्नेहल परीटकर, योगेश शिनगारे, अमित पोळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यामधील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे कवलापूरमधुन विराणी प्रवीण काटकर,शंभवी सुहास पाटील, संचिता सचिन माळी,आयुष अमोल कदम, वैदही महादेव नलावडे, सुदर्शन कैलास गुंडे, सृष्टी सचिन मुळे तर चॅम्पियन म्हणून वेदांत महादेव नलवडे याची निवड करण्यात आली. बुधगावमधून ऋग्वेद श्रीकांत कुंभार,दिशा सतीश गायकवाड, आराध्य बजीरंग जाधव,सार्थक सतीश राजोपाध्ये, शिवराज राजू तारदळे, अभिनव शिवराज माळी, कार्तिक प्रदीप मोहिते तर चॅम्पियन म्हणून सिया राहुल पाटील हिची निवड झाली.
बिसुरमधून विराट बाळासाहेब पाटील, ऋग्वेद संतोष पाटील, शिवतेज संतोष भगत, शंभवी संतोष पाटील, आराध्या अभिजित पाटील, प्रेम जगदिश मोहिते तर चॅम्पियन म्हणून केतकी माणिक पाटील,आरोही उदय पाटील, वैष्णवी दिगंबर पाटील, ऋषिकेश तानाजी पाटील यांची निवड करण्यात आली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
या झालेल्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना एक संधी मिळाली तसेच गाव पातळीवर असणारे विद्यार्थ्यांचे प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व पहावयास मिळाल्याने पालकांकडून आयोजकांचे आभार मानण्यात आले. तसेच अशा स्पर्धा वारंवार घेऊन मुलांच्या बुद्धिगुणांना चालना द्यावी ही मागणी करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत