Breaking News

कंपनीने केला नोकारी -कुसुंबी, लिंगडोह-आसापूर रस्ता गिळकृत

 तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली 

कंपनीने केला नोकारी-कुसुंबी, लिंगडोह-आसापूर रस्ता गिळकृत

महा घडामोडी न्युज नेटवर्क,कोरपना : स्वातंत्रपूर्व काळातील वहिवाटीचा नोकारी बु कुसुंबी लिंगडोह जिवती तालुक्यातील दहा ते पंधरा गावांना जोडणारा मुख्य रस्ता निस्तार पत्रकानुसार सर्वे नंबर २,६,३३,३४,३५,१०,१७,१९,१५,१४,१३,३०,३१  मधून ३३ फूट रुंदीचा रस्ता असल्याची नोंद फसली नकाशा व १९६४ च्या गाव नकाशा वरून तसेच सॅटॅलाइट छायाचित्र नुसार निस्तार पत्रांमध्ये माणिकगड माईन्स कॉलनी मधून जात असून त्या रस्त्यावर शासनाची परवानगी न घेता ठिकठिकाणी गेटवर सुरक्षारक्षक द्वारे नागरिकांना अडवणूक केल्या जात आहे.

 १७/०८/१९८१ ला केलेल्या करारामध्ये मुद्दा क्रमांक पाच मध्ये पब्लिक रोड वहिवाटीचा कायम राहील असे नमूद असताना कंपनीने या सार्वजनिक रस्त्यावर माईन्स क्रेशर सायलो तसेच विद्युत डीपी व रोपव्हे चे बांधकाम करून अवैद्य मार्गांनी बांधकाम केले आहे तसेच १७/०८/१९८१ च्या भाग क्रमांक ३ चा मुद्दा क्रमांक पाच मध्ये भाडेपट्टी धारकाला सार्वजनिक रस्त्यावर काम करता येत नाही असे स्पष्ट नमूद असताना सुद्धा अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण रस्त्यावर झालेले आहे व प्रशासन गप्प आहे

 नागरिकांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १६१ व  १६५ मधील तरतुदीच्या अधिकाराचा वापर करून तहसीलदार राजुरा यांनी सदर रस्ता खुला करण्याचे आदेश पारित केले मात्र कंपनीने मोजा कुसुंबी येथील सर्वे नंबर २,६,१०,१६  या मधील संपूर्ण खदान खोदून चुनखडी उत्खनन केले आहे व रस्त्याला वळण देऊन नाल्याच्या काठा वरून काढण्यात आले आहे शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही रस्त्यावर अनधिकृत बांधकामाच्या काढण्याच्या आदेशाला कंपनीने केराची टोपली दाखवली उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली आहे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून मुख्यमंत्री सडक योजनेचे काम कंपनीने अडवून ठेवले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत