महावितरण चे लाखनी उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर हल्लाबोल
उप अभियंता राजन लिमजे यांना हटविण्याची मागणी
महा घडामोडी न्यूज विशेष प्रतिनिधी कालीदास खोब्रागडे, भंडारा ;- भंडारा ये थील वीज वितरण कंपनी चे उपअभियंता राजन लिमजे हे मोठे वीज ग्राहक, व्यवसायिक, उद्योग वीज चोरी करीत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता ग्रामीण भागातील ग्राहकांना त्रास देतात. त्यांचा बंदोबस्त करावा. या करिता २७ मे रोजी संयुक्त लोकशाही आघाडी समर्थित रिपब्लिकन सेनेद्वारे निवेदन देऊन भ्रष्ट उपअभियंत्याचे स्थानांतरण करण्याची अधिक्षक अभियंता विद्युत भवन भंडारा यांना मागणी केली होती.
यास १५ दिवसांचा कालावधी लोटून सुद्धा महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे १६ जून रोज गुरुवार ला अचल मेश्राम, रमेश खेडकर, प्रवेश खोब्रागडे, रामलाल मांढरे, भगवान ढेंगे, दिनेश पंधरे, करण फसाटे, कृष्णा मांढरे, अजय ढेंगे यांचे नेतृत्वात तहसील कार्यालयापासून तिरडी आंदोलनास सुरुवात करण्यात आली. आंदोलक राष्ट्रीय महामार्गाने "उपकार्यकारी अभियंता राजन लिमजे हटाओ एमएसीबी बचाओ" अशा घोषणा देत उपअभियंता कार्यालयावर आंदोलक पोहचले.
नायब तहसीलदार मडावी, उपकार्यकारी अभियंता राजन लिमजे यांच्याशी आंदोलनकर्त्यांकडून चर्चा करण्यात आली. तथा मागणी चे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार व उपकार्यकारी अभियंत्याने मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हल्लाबोल आंदोलन सांगता करण्यात आली.
आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आयोजकांनी दिला होता. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. हल्लाबोल आंदोलनास बहुसंख्येने अन्यायग्रस्त शेतकरी, शेतमजुर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत