स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पुढाऱ्यानी कट करून पाडलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना मनसे न्याय देणार ~ अविनाश पवार
स्थानिक स्वराज्य संस्थानमध्ये पुढाऱ्यानी कट करून पाडलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना मनसे न्याय देणार ~ अविनाश पवार
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,दत्ता ठुबे,पारनेर : महाराष्ट्र नवनिर्मिण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने दिनांक २६ रोजी हिंदू जननायक श्री राज साहेब ठाकरे यांचे भोंगे मुक्त महाराष्ट्र या संकल्पनेची जन जागृती मोहिम रांजणगाव मशीद,पिंपरी गवळी,वाळवणे येथे पञक वाटप करुन भोंगे हा धार्मिक विषय नसुन सत्ताधारी विरोधकांनी पारनेर तालुक्यातील जनतेत पसरविलेला गैरसमज दूर करण्यासाठी घरोघरी जाऊन प्रत्यक्षात नागरिकांच्या भेटी घेऊन जनजागृती करुन हा कशा प्रकारे सामाजिक विषय आहे व यापासून होणारा त्रास कसा होत असल्याचे सर्व सामान्य लोकांना भेटून सांगण्यात आले.
त्यावेळी लोकांनी त्याच्या भावणा स्पष्ट शब्दांत व्यक्त केल्या व श्री.राज साहेब ठाकरे यांचे आभार व्यक्त केले त्यामुळे हे स्पष्ट होते आहे की जिल्हा परिषद पचांयसमीती निवडणुकानसाठी तालुक्यातील गावा गावातील स्थानिक स्वराज्य संस्थान मध्ये पाडा पाडीचे राजकारण सत्ताधारी आणि विरोधकांनी गुप्त पध्दतीने युती, सेटलमेंट करून सर्व सामान्य कार्यकर्ताना संपविण्याचा गलिच्छ डाव पारनेरच्या नेते मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी खेळल्याचा अविनाश पवार मनसे तालुका उप अध्यक्ष पारनेर यांनी जाहिर आरोप केला.
नेते मंडळीच्या गलिच्छ राज कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थान मध्ये पडलेल्या सर्व सामान्य कार्यकर्ताच्या मागे महाराष्ट्र नवनिर्मिण सेना खंबीरपणे उभी राहिल त्यामुळे येणार्या जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये पडलेल्या ह्याच उमेदवारांना सोबत घेऊन पारनेरच्या पुढार्यानः त्यांची जागा सामान्य कार्यकर्ता दाखवल्या शिवाय शांत बसणार नाही असे पवार यांनी बोलताना सांगितले यावेळी सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत