Breaking News

मौजा सातारा तुकुम येथील जिल्हा परिषद शाळा वर्गखोली बांधकाम व सातारा भोसले येथील आर.ओ.प्लान्ट चे लोकार्पण कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य मा.राहुल संतोषवार यांच्या उपस्थितीत पार पडले.

 मौजा सातारा तुकुम येथील जिल्हा परिषद शाळा वर्गखोली बांधकाम व सातारा भोसले येथील आर.ओ.प्लान्ट चे लोकार्पण कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य मा.राहुल संतोषवार यांच्या उपस्थितीत पार पडले.

ग्रामपंचायत सातारा भोसले च्या सरपंच सौ.शालीना सिडाम यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले.

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,गणेश परचाके, पोंभुर्णा : माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य मा.राहुल संतोषवार यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 14 लक्ष रुपये खर्चाच्या निधीचे सातारा तुकुम येथील जिल्हा परिषद शाळा वर्गखोली,सातारा भोसले ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळील आरओ प्लांट चे लोकार्पण मंगळवारी (ता.28)मा.राहुल संतोषवार यांच्या उपस्थितीत सरपंच सौ.शालीना सिडाम यांचे शुभहस्ते फित कापून करण्यात आले.जिल्हा निधी अंतर्गत इमारतीच्या बांधकामाकरिता जिल्हा निधी मधून निधी मंजूर करण्यात आले होते.

गाव खेड्यामधील एकही विद्यार्थी शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार नाही,यासाठी गावागावांत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने आवश्यक त्या सोयी सुविधा शाळेला पुरविल्या जात आहे.जिल्हा परिषद शाळेला इमारत मिळाल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.सर्व सामान्यांच्या पोरांची शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक प्रगती करण्यासाठी शिक्षकांनी स्वत:चे दायित्व समजून जागरुकपणे प्रयत्नशील राहण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य मा.राहुल संतोषवार यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच सातारा भोसले येथील जलशुद्धीकरण (R.O.) एटीएम चे लोकार्पण फित कापून पार पडले.पाणी जलशुद्धीकरण होत असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहणार आहे.यावेळी गावातील जनतेनी आभार मानले.कार्यक्रम प्रसंगी,उपसरपंच मा.प्रवीण पेंदोर,सदस्य मा.नितीन पेंदोर,गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रावण तोडासे,माजी सरपंच नानाजी तोडासे,माजी सरपंच कविताताई मडावी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उष्टुजी मडावी,

उपाध्यक्ष अर्चनाताई कोवे, गुलाब मडावी, प्रतिष्टीत नागरिक दशरथ सोनटक्के, राजेश्वर मडावी, भीमराव मडावी,शालूताई मडावी,ग्रामसेवक चिमुरकर, मुख्याध्यापक गांगरेडी वार सर, कर्मे मॅडम सोरते सर,सोरते मॅडम,ग्रा.पं.कर्मचारी विनायक पुठ्ठावार,कैलास पेंदोर, ऑपरेटर सचिन सिडाम,गणेश परचाके,नरेंद्र सिडाम,ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत