सांगवे तालुका रावेर येथे आदिवासींच्या घरात पावसाचे पाणी शिरले तहसीलदाराना निवेदन !
सांगवे तालुका रावेर येथे आदिवासींच्या घरात पावसाचे पाणी शिरले तहसीलदाराना निवेदन !
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,जळगांव : दिनांक 14 जुलै 2022 रोजी नायब तहसीलदार संजय तायड़े यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे कि गृप ग्रामपंचायत विटवे यांच्या कड़े लेखी व तोड़ी स्वरुपात सांगितले तरीही सदर सांडपाण्याची व्यवस्था न केल्याने आज पावसाचे जास्तीचे पाणी आदिवासींच्या घरात शिरले व त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून घराच्या भिंती पडक्या झालेल्या आहेत.
त्या केव्हाही कोसळून पडु शकतात त्यामुळे जीवित हानी होऊन संसार उघड्यावर येऊ शकतो अशा आशयचे निवेदन देण्यात आले निवेदनावर, जनक्रांती मोर्चा युवा जिल्हा अध्यक्ष, साहेबराव वानखेड़े पं. समिती सदस्य दिपक पाटील ग्रा. पं. सदस्य. सुरेश कोळी, रतन भिल्ल, शिवाजी कोळी, गजानन कोळी, वंदना भिल्ल, उषाबाई भिल्ल, कंबाबाई कोळी, सखुबाई भिल्ल, शुभम कोळी, विमलबाई भिल्ल, छाया बाई भिल्ल, इ.निवेदन देते वेळी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत