त्या अपघातासंदर्भाने गावात वेगवेगळ्या चर्चांना उधान
त्या अपघातासंदर्भाने गावात वेगवेगळ्या चर्चांना उधान
पोलीस तपास योग्य दिशेने होण्याची गरज जनमानसात चर्चा
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष रोकडे,अर्जुनी मोर : अर्जुनी मोर तालुक्यातील इटखेडा येथील विनोद मधुकर मैंद यांचा राज्य महामार्ग क्रमांक 275 खामकुरा गावाजवळ वाहनाच्या धडकेने दिनांक 6 जून च्या रात्री अपघाताने मृत्यू झाला मात्र घटनेच्या दुसऱ्या दिवशी पासून गावात या अपघाताबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे चर्चांमध्ये घातपात की अपघात अशा वेगवेगळ्या चर्चा पंचक्रोशीत पसरलेले आहेत.
त्यामुळे या अपघाताचे पोलीस यंत्रणा कडून निष्पक्ष चौकशी होईल काय अशा चर्चा सुरू आहेत सविस्तर वृत्त असे की घटनेच्या दिवशी मृतक विनोद तसेच अन्य दोघेजण असे एकूण तिघे मटन विकण्यासाठी महागाव येथील साप्ताहिक बाजारात गेले होते तेथे दारू ढोसून पैशांच्या वाटपावरून भांडण झाले व त्यानंतर सुद्धा पुन्हा दारू प्याले उर्वरित दोघेजण आपापल्या घरी गेले तर मृतक विनोद याचा खामकुरा गावाजवळ राज्य महामार्गावर अपघात झाल्याचे दिसले तर मृतक विनोद याची सायकल इसापूर येथील एका इसमाच्या घरी मिळून आली हा इसम विनोद सोबत मटन विकण्यासाठी महागाव येथे बाजारात गेला होता एकंदरीतच या अपघाताची सविस्तर चौकशी होणे अपेक्षित आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत