Breaking News

लखमापूर येथील विद्युत पोल मोजतो शेवटची घटका

 लखमापूर येथील विद्युत पोल मोजतो शेवटची घटका

महावितरण विभागाचा गलथान कारभार,अपघाताची शक्यता

महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील हनुमान मंदिराजवळील विद्युत पोल गंजून काही वर्षे उलटून वारंवार तक्रार करूनही महावितरण विभाग गडचांदूर दुर्लक्ष करीत आहे.

   सततच्या वारा पावसामुळे मुळातून पूर्णपणे गंजलेला पोल कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होऊन जिवीत हानी होऊ शकते हनुमान मंदिराजवळूनच शाळकरी विद्यार्थी ग्रामस्थ वाहनांची मोठी वर्दळ असल्याने ग्रामस्थांना याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या गंजलेल्या पोलाची संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष वेधून तातडीने हा पोल बदलवून मिळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 महावितरण विभाग फक्त वीज बिल वसुलीतच मश्गुल आहे लखमापूर कारवा निमणी बाखर्डी तळोधी या गावाची सुध्दा हीच परिस्थिती आहे कोणतीही देखभाल दुरुस्ती नाही जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हाच दुरुस्ती होते तेव्हा आपण तात्काळ याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी अन्यथा गावकऱ्यांच्या रोशाला सामोर जावे लागेलं. - मोरेश्वर आस्वले,माजी उपसरपंच लखमापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत