Breaking News

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनच पिकांचे मोका पंचनामे करा!

 शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनच पिकांचे मोका पंचनामे करा!

हकानी शेख व नागेश खांडेकर विनोद पवार ,सुदाम राठोड यांची तहसीलदाराकडे निवेदनातून मागणी

महा घडामोडी न्युज, तालुका प्रतिनिधी, शेख हकानी,जिवती : गेल्या पंधरवाड्यात सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्यासंदर्भात प्रशासनाला अनेक निवेदन प्राप्त झाले आहेत. पण संबंधित प्रशासन त्या प्राप्त झालेल्या निवेदना संदर्भात योग्य दखल घेताना दिसत नाही. तालुक्यातील महसूल विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या बांधावर न जाताच कार्यालयात बसून पंचनामे करीत असल्याचा धक्कादायक प्रकार कळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष हकानी शेख व युवा आघाडी चंद्रपूर विभाग प्रमुख सुदाम राठोड यांनी जिवती तहसिलदार जिवती यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनच मोका पंचनामे करावेत या बाबत निवेदन देण्यात आले. तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. ते शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान नसून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानी मनाला नतभ्रष्ट वृत्ती कडून झालेली पिळवणूकच म्हणावी.

लागेल. शेतकऱ्यांच्या शेतातील पिक शेतातच अतिवृष्टीमुळे सडत असून. शेतकरी खरीप हंगामात गावातल्या सावकारांकडून व बँकाकडून कर्ज घेऊन किंवा स्वतःचे शेत गहाण ठेवून, संघर्षमय परिस्थितीत शेतात खर्च करण्याची हिम्मत करणारा शेतकऱ्याला यावर्षी आसमानी संकटाला सामोरे जावे लागले. खरीप हंगामातील पिक मुग, उडीद, कापूस, ज्वारी, सोयाबीन हे पीक अतिवृष्टीमुळे नासत व सडत आहे. आणि शेतकऱ्यांच्या तोंडाशी येणारा घास अतिवृष्टीने हिरावून घेतला तरीही कर्जाचा बोजा डोक्यावर घेऊन फिरणारा पीडित शेतकरी व साडेसाती लागलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबाला अश्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. व मागे सतत पंधरादिवस झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान हे आपल्या उघड्या डोळ्यांनी बघणारा शेतकरी आता मनाने पूर्ण खचलेला आहे. जगाचा पोशिंदा म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारा राजा आता हतबल झालेला आहे. अशा संकटकाळी त्याला धीर व आशेचे किरण जागृत करण्यासाठी शेतकरी राजाला स्वावलंबी बनवण्यासाठी त्याच्या शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याला शासकीय मदत जाहीर करावी.

मागील काही वर्षांचा अनुभव बघता, पिकांचे झालेले पंचनामे व त्याच्या नोंदीमुळे तालुक्यात फक्त पिक विमा कंपनीचा फायदा झाल्याचे दिसत आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंची मस्करी शासन व पिक विमा कंपनी हसत-हसत करत आहे. त्या अनुषंगाने आता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे प्रत्येक गाव निहाय व्हावेत व त्या पंचनाम्या वेळेस त्या शेतकऱ्याला ही त्याच्या शेतात बोलावून त्याच्या समक्ष पंचनामे करावेत. व तलाठ्यांनी प्रत्येकाच्या शेतात 

जाऊनच पंचनामे करावेत. आपल्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गावात जाऊन व शेतात जाऊनच पंचनामे केले पाहिजेत. प्रशासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता स्वतःच्या कार्यालयातच बसून चुकीचे पंचनामे केले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाइल आंदोलन उभे करण्यात येईल. असा इशारा ही यावेळी देण्यात आला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरच जाऊन मोका पंचनामे करण्याची मागणी तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हकानी शेख व युवा आघाडी चंद्रपूर विभाग प्रमुख सुदाम राठोड यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत