सुपा औद्योगिक वसाहती मधील कामगारांचा छळ थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरु - अविनाश पवार
सुपा औद्योगिक वसाहती मधील कामगारांचा छळ थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरु - अविनाश पवार
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दत्ता ठुबे, पारनेर : सुपा एम आय डिसी मध्ये कंपनी व्यवस्थापणान पुरुष व महिला कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करत नसल्याच्या तक्रारी अविनाश पवार यांना प्राप्त झाल्यावर याची खात्री केली असता अनेक धक्कादायक व गंभीर गोष्टी बाहेर आल्या एमआयडीसी मध्ये काम करणार्या कामगारांना कुशल आणि अकुशल कामाचा मोबदला मिळत नसल्याचं निदर्शनास आलेे.
कुशल कामगाराकडुन अकुशल कामगारांचे कामं करुन घेतली जातात तसेच आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करत नसल्याचे निदर्शनास आले ठेकेदाराकडुन कामगारांना त्याच्या कामाचा मोबदला मिळत नाही आहे पेमेंट स्लीप देणं बंधनकारक असताना सुद्धा दिली जात नाही धक्कादायक गोष्ट म्हणजे परप्रांतीय कामगारांची बनावट कागदपत्राच्या माध्यमातून ठेकेदाराकडुन कंपनी मध्ये भरती केली जाते ही अतिशय गंभीर बाब आहे बोगस आधार कार्ड बणविले जाते व या माध्यमातून बालकामगाराचं शोशन केलं जात असल्याची शक्यता नाकारता येत नाहीी.
तसेच कंपनी कामगारांना एक पगार देते आणि ठेकेदाराकडुन कामगारांना एक पगार दिला जातो कामगारांचे दडपशाहीच्या मार्गाने शोशन होते आहे त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे सुपा एम आय डिसी मधील सर्व कंपनी मध्ये कामगारांचे पेमेंट हे कामगारांच्या खात्यावर जमा व्हायला हवेत व कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय
योजना करण्या संदर्भात सर्व कंपन्यांची योग्य ती चौकशी करून दोषीं कंपनी वर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने कामगार आयुक्त यांना निवेदन देऊन केली आहे जर योग्य ती कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने सुपा एमआयडीसी मध्ये कामगारांच्या न्याय हक्कासाठी तक्रार प्राप्त झाल्यावर कंपनी मध्ये कोणतीही पुर्व सुचना न देता मनसे स्टाईल आनदोंलन करण्यात येईल व याची सर्व जिम्मेदारी कामगार आयुक्त साहेब व कंपनी व्यवस्था पणाची असेल असे अविनाश पवार यांनी बोलताना सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत