Breaking News

रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर तर्फे पूरग्रस्तांना दोन दिवसापासून जेवणाची व्यवस्था

 शेकडो ट्रक, ट्रॅव्हल्स बामणी-राजुरा रोडवर, बामणी-आमडी रोडवर व बामणी-बल्लारपूर रोडवर पुरामुळे अडकले

रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर तर्फे पूरग्रस्तांना दोन दिवसापासून जेवणाची व्यवस्था

महा घडामोडी न्युज नेटवर्क,चंद्रपूर : विदर्भात सतत सुरु असलेल्या पावसामुळे वर्धा नदीच्या जवळील गावात पूरजन्य स्थिती निर्माण झालेली आहे आणि बल्लारपूर-राजुरा मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे शेकडो ट्रक, ट्रॅव्हल्स बामणी-राजुरा रोडवर, बामणी-आमडी रोडवर व बामणी-बल्लारपूर रोडवर अडकून पडलेले आहेत. तसेच काही प्रवास्यांनी बल्लारपूर बस स्टॅन्ड वर आसरा घेतलेला आहेत. प्रवाशी आणि ट्रकड्रायव्हर यांना होत असलेल्या उपासमारीची आणि त्रासाची दखल घेत रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर तर्फे या सर्वाना २ दिवसाचा जेवणाची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर तर्फे पुरीभाजी, पुलाव चे वाटप करण्यात आले. या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर कडून रोटे प्रफुल चरपे, अध्यक्ष, रोटे महेश कायरकर सचिव , रोटे राहुल वरू, सह सचिव रोटे कल्पेश पटेल प्रोजेक्ट डायरेक्टर, रोटे उमेश  पटेल प्रोजेक्ट डायरेक्टर, रोटे उत्तम पटेल, रोटे lpp मनिष मुलचंदानी, रोटे निलेश चिमद्यालवार, रोटे राजू मुडदा, रोटे वैभव मेनेवार ,रोटे अजय वासलवार,रोटे विक्रम पंडित, रोटे अखिल निखारे, रोटे अनुप गणशेट्टीवार, रोटे प्रशांत दोंतुलवार, रोटे प्रशांत भोरे , रोटे आकाश राजभर तसेच रोट्रैक्ट टीम चा यांचा सहभाग लाभला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत