Breaking News

बपेरा येथे मुसळधार पावसामुळे पडले गुरांचे गोठे जनावरांचा जागीच मृत्यू

 बपेरा येथे मुसळधार पावसामुळे पडले गुरांचे गोठे जनावरांचा जागीच मृत्यू

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम,भंडारा : मागील ८ दिवसांपासून व रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मौजा बपेरा सि येथे शंकरजी राऊत, हरिरामजी राऊत कृष्णा राऊत यांचे गुरांचे गोठे पडल्यामुळे त्यात असलेली म्हैस मृत्यु पावली असून त्यासंदर्भात संबंधित नुकसान झाल्याची माहिती मा.तहशिलदार साहेब व मा.गट विकास अधिकारी साहेब यांना दिली त्याच बरोबर नुकसान झालेल्या मालमत्तेची भरपाई व गुरांचा गोठा तात्काळ मंजुर करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.

यावर त्वरित सदर नुकसान झालेल्या गोठ्यांचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्याची पाहणी करताना . नंदुभाऊ रहांगडाले सभापती पं.स.तुमसर व नंदागवळी साहेब मा.गटविकास अधिकारी पं.स.तुमसर तुमसर. सौ ममता शोभाराम राऊत सरपंच बपेरा ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य राजु शहारे शोभारामजी राऊत, सचिन खंगार, व समस्त गावकरी उपस्थित होते ‍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत