Breaking News

वडगाव आमली सेवा संस्थेवर आ. लंके यांचे निर्विवाद वर्चस्व

 वडगाव आमली सेवा संस्थेवर आ. लंके यांचे निर्विवाद वर्चस्व 

चेअरमनपदी सीताबाई गायकवाड तर व्हाइसचेअरमन पदी गोविंद शिंदे यांची निवड 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दत्ता ठुबे, पारनेर : नगर विधानसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या सर्वाधिक सेवा सोसायटीवर पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी वर्चस्व सिद्ध करत आपल्या संघटनात्मक कार्याची चूणूक पुनश्च एकदा दाखवून दिली आहे,पारनेर तालुक्यातील अटीतटीची समजली जाणारी वडगाव आमली विविध कार्यकारी सोसायटीची निवड प्रक्रिया पार पडली.

 त्यामध्ये चेअरमन आणि व्हाइस चेअरमन निवडणुकीमध्ये सीताबाई महादू गायकवाड यांची चेअरमन पदी तर बाळासाहेब गोविंद शिंदे यांची व्हाइस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित संचालकांनी आमदार निलेश लंके जनसंपर्क कार्यालय पारनेर येथे जाऊन आपला आनंद व्यक्त केला व आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात सेवा संस्था वाढविण्याचा व पारदर्शकपणे कारभार करण्याचा मानस व्यक्त केला.

यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालकांचा आमदार निलेश लंके जनसंपर्क कार्यालयात आमदार निलेश लंके यांच्या वतीने येथोचिच सन्मान करत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या !यावेळी दत्तात्रय पवार ,राजू शेठ गायकवाड,भाऊसाहेब डेरे ,शिवाजी डेरे गुरुजी , बबन चौरे ,बाबासाहेब औटी ,नवनाथ ढोणे ,सुनील जाधव ,रंगनाथ ठाणगे ,,महादेव पवार,हिरामण डेरे ,सचिन पट्टेकर ,किरण शिंदे,लक्ष्मण धोत्रे ,धनंजय डेरे,सारंगधर शिंदे,संभाजी औटी, संभाजी पवार ,विठ्ठल सोनवळे,गुलाब पवार ,सुधीर पटेकर,संभाजी डेरे यासह विविध मान्यवर वडगाव आमली गावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत