बाभूळ सरच्या देवयानीची चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवड
बाभूळ सरच्या देवयानीची चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवड
महा घडामोडी न्युज नेटवर्क, मुंबई : आवड आणि कठोर परिश्रम घेण्याची ताकद मनाशी बाळगून देवयानी वाळके या ११ वर्षाच्या मुलीने चित्रपट क्षेत्रात येण्याचे ठरवले. आई-वडिलांचा विश्वास आणि साथ घेऊन अॅक्टींग ,डान्सचे प्रशिक्षण घ्यायचे निश्चित केले आणि शिरूर येते १३ वर्षापासून सुरु असलेले नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट गाठले . ऊन असो व पाऊस वारा सर्व गोष्टींना सामोरे जाऊन ६ महिण्याने अॅक्टींग ,डान्सचे प्रशिक्षण शंभर टक्के उपस्थितीत पूर्ण केले
आणि लेखक दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे यांचा एक नवीन चित्रपट सुरू होणार असल्यामुळे त्यांनी मुख्य भूमिकेसाठी नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूटच्या दोन विद्यार्थ्यांची निवड कण्याचे ठरले आणि मुख्य भूमिकेसाठी 24 विद्यार्थ्यांचे ( कलाकार )ऑडिशन घेण्यात आले. या ऑडिशन मधून देवयानी वाळके आणि आदर्श गुप्ता या दोघांची निवड करण्यात आली. देवयानीची आवड ,मेहनत पाहता ती या चित्रपटातील तिच्या कॅरेक्टरला नक्कीच न्याय देऊ शकेल असे इन्स्टिट्यूट मध्ये कोर्स करत असलेल्या इतर विद्यार्थी आणि पालकांनी मत व्यक्त करत तिला तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे यांचे सध्या २ चित्रपटाचे काम सुरू आहे एक म्हणजे पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके यांच्या जीवनावर आधारित आखाडा चित्रपटाची घोषणा त्यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये चित्रपट सृष्टीत प्रथमच सलग पाच दिवस वेगवेगळे उपक्रम राबवून केला . दुसरा म्हणजे देवयानी वाळकेची निवड झाली आहे तो चित्रपट. पण त्या चित्रपटाचे नाव मात्र दिग्दर्शक यांनी अजून गुलदस्त्यातच ठेवले आहे. असे देवयानी वाळके यांनी सांगितले तरी देवयानी वाळकेच्या या गुलदस्ता मधील चित्रपटासाठी खूप शुभेच्छा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत