Breaking News

वीज पडून महिला जखमी,दूधवाही येथे वीज झाडावर कोसळली

वीज पडून महिला जखमी,दूधवाही येथे वीज झाडावर कोसळली

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,ब्रम्हपुरी : ब्रह्मपुरी पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दूधवाही येथे झाडावर विज कोसळून घरातील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली दूधवाही येथील माधुरी जनार्दन सौंदरकर वय ४५ वर्षे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे ही महिला आपल्या घरात चाय बनवित असताना.

 घराच्या मागील झाडावर वीज पडली असता झाड आणि त्यांचा घर हे संपर्कात आल्यामुळे विजेच्या प्रभाव महिलेवर झाला या महिलेचा डोक्यावर विजेचा प्रभाव झाला असून एका डोळ्यातून रक्त निघत असून ती महिला गंभीर जखमी झाली आहे महिलेला उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. यापूर्वी भगवानपूर येथील इसमाचा आढळ येथील तलावात वीज पडून मृत्यू झाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत