Breaking News

सायघाटा परीसरात नागरिकांना प्रवेश बंदी, प्रसिद्ध हनुमान देवस्थानचे दर्शन बंद

 सायघाटा परीसरात नागरिकांना प्रवेश बंदी, प्रसिद्ध हनुमान देवस्थानचे दर्शन बंद

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी नागभिड राष्ट्रीय महामार्गावरील सायघाटा जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याचे दिसून येत असल्याने वाघाला पाहण्यासाठी होणारी लोकांची गर्दी लक्षात घेऊन वाघ मानव संघर्ष टाळण्यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाने सायघाटा जंगल परिसरात जाणारे रस्ते बरिकॅट्स लाऊन वाहतुकी करता बंद केले आहेत. सायघाटा जंगल परिसरातील रस्ते बंद केल्याने जंगल परिसरातील प्रसिद्ध हनुमान देवस्थानच्या दर्शना पासून भक्तांना वंचित व्हावे लागत आहे.

 

 ब्रम्हपुरी वन विभाग अंतर्गत येणाऱ्या सायघाटा जंगल परिसरात वाघाच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे.मागील काही दिवसांपासून ब्रम्हपुरी नागभिड राष्ट्रीय महामार्गावर व सायघाटा जंगल परिसरात लोकांना वाघ पाहायला मिळाला. वाघ असल्याची माहिती मिळताच अनेक जण दुचाकी,चारचाकी वाहनांने परिवारासह वाघ दर्शनासाठी येत असून यामुळे या परिसरात वाहनांची गर्दी होताना दिसत आहे.

नुकतेच काही दिवसा अगोदर याच परिसरात शौचालयास बसलेल्या एका व्यक्तीला वाघाने ठार मारले होते.आता वाघ बघायला लोकांची गर्दी होताना बघून कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाने सायघाटा जंगलात जाणारे मुख्य रस्ते बरिकेट लाऊन बंद केले आहे.सायघाटा जंगल परिसरात प्रसिद्ध हनुमान देवस्थान आहे.आता वनविभागाने मंदिराकडे जाणारा रस्ताच बारीकेट लाऊन बंद केल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत