Breaking News

के.बा.विद्यालयात हात मदतीचा सामाजिक उपक्रमाचे थाटात उद्घाटन

 के.बा.विद्यालयात हात मदतीचा सामाजिक उपक्रमाचे थाटात उद्घाटन

गरजु व होतकरू ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांचा स्तुत्य उपक्रम 

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी सूरज शहाणे सेलू : 7 जुलै बुधवार रोजी शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालयात शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या वतीने हात मदतीचा सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन सेलूचे तहसीलदार दिनेश झांपले व माजी सैनिक गोरख राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तथा कै .दत्तात्रय हेलसकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आले. 

 

या प्रसंगी श्रीकेशवराज बाबासाहेब शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड लक्ष्मीकांत सुभेदार यांचीउद्घाटक म्हणून उपस्थिती होती ह्यावेळी व्यासपीठावर तहसिलदार दिनेश झांपले, माजी सैनिक गोरख राऊत , प्रा. के डी वाघमारे,संयोजक सुनिल गायकवाड मुख्याध्यापक सुभाष नावकर हे उपस्थित होते. तसेच किशोर खारकर, अबरार बेग, रमेश दोड ,प्रशांत ठाकूर, सतीश जाधव, गुलाबराव गायकवाड, आशोकराव खताळ, आदिंचीही उपस्थिती होती. 

मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, वह्या आदींचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविकात सुनिल गायकवाड म्हणाले की ,'हात मदती चा' हा शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम माझा नसून शहरातील दानशूर व्यक्तीचा आहे .या उपक्रमाचे प्रेरणास्थान माझे आदर्श तथा सानेगुरूजी कथा मालेचे शाखा अध्यक्ष कै. दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम मी शहरातील पाच शांळात राबविणार असून आज याचे उद्घाटन होत आहे. असे संयोजक सुनिल गायकवाड यांनी सांगीतले.

तहसीलदार दिनेश झांपले यांनी 'शहरातील दान शुर नागरीकांनी या उपक्रमाचा खारीचा वाटा उचलल्यास जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमातुन मदत मिळेल. 'असे मनोगत व्यक्त केले. 

प्रा के डी वाघमारे,माजी सैनिक गोरख राऊत ,अॅड एल एम सुभेदार यांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक सुनिल गायकवाड, सूत्रसंचालन मंगेश कुलकर्णी तर आभार योगेश ढवारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के. बा. तील शिक्षकवृंदासह विठ्ठल काळे,आण्णासाहेब गायकवाड, बंडू क्षीरसागर, सौ मुंढे आदिनी परिश्रम घेतले .कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत