Breaking News

सेलू त नांदेड-पुणे एक्सप्रेस चे जल्लोषात स्वागत

 सेलू त नांदेड-पुणे एक्सप्रेस चे जल्लोषात स्वागत

(सेलू) येथील रेल्वे स्थानकावर द. म. रे. ने प्रारंभ केलेल्या नांदेड -पुणे एक्सप्रेस चे मंगळवार ता. ५ जुलै रोजी सायंकाळी ५.३०वा.जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, सूरज शहाणे,सेलू : मागील अनेक वर्षांपासून नांदेड-पुणे ही आठवड्यात दोन वेळा धावणारी रेल्वे सेवा नियमित करावी अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघ व सर्व नागरीकांनी अनेक वेळा निवेदनाद्वारे दमरे व रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. नागरीकांची ही मागणी खा. संजय जाधव, आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी रेल्वे राज्य मंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्या कडे पाठपुरावा करून मंजुर करून घेतली. 

त्याची अंमलबजावणी ५ जुलै पासुन करण्यात आली आहे. सायंकाळी ५:३० वा नांदेड - पुणे सेलू रेल्वे स्थानकावर येताच ढोलताशांच्या गजरात मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने रेल्वे चालक पी. व्ही.सिंग,विनोद कुमार,स्टेशन मास्तर आर. के. पाठक,धिरेनकुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवुन जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख मनिष कदम,शशिकांत देशपांडे, मरेप्रसंघाचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी, चंद्रशेखर मुळावेकर,राजेंद्र सराफ, प्रांताध्यक्ष डॉ विलास मोरे,शेख मुनीर, वल्लभ राठी, अरूण माणकेश्वर, हितेश शहा, ईश्वर जैन, आनंद बाहेती, राजेंद्र करवा, कृष्णा काटे, अजीत मंडलिक, सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड, रेवा कुंदनानी, श्रीनिवास काबरा, मोहन खापरखुंटीकर, भगवान पावडे, सुभाष मोहकरे आदींची उपस्थिती होती. 

सेलू रेल्वे स्थानकाचे वार्षिक उत्पन्न पाच कोटी रूपये असुन ही कोरोनो काळात बंद करण्यात आलेल्या प्रवासी गाड्या पुर्ववत सुरू कराव्यात, तसेच नगरसोल-नरसापूर व नरसापूर-नगरसोल रेल्वे ला सेलू स्थानकावर थांबा मिळाल्यास शिर्डी-सेलू -पाथरी ही साईबाबांची जन्म भूमि, व सेलू सदगुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज तपोभूमीतून शिर्डी ला जाणाऱ्या भाविकांची व्यवस्था होईल व रेल्वे च्या उत्पन्नात ही मोठी वाढ होऊन तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत