पंचायत समितीची इमारत जीर्णावस्थेत,जीव धोक्यात घालून कार्यालयीन कामे
पंचायत समितीत पाण्याची गळती
पंचायत समितीची इमारत जीर्णावस्थेत,जीव धोक्यात घालून कार्यालयीन कामे
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामीण भागाचा कणा असलेल्या पंचायत समिती ब्रम्हपुरी येथे संपूर्ण विभागात पाणी गळती सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी जिर्णोद्धार झालेली पंचायत समिती कार्यालय शासनाकडून निरलेखीत करण्यात आली असूनही सदर इमारती मध्ये पंचायत समितीत संपूर्ण विभागाचा कार्यभार सुरू आहे. मागील वर्षी शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाचा पावसाने छत कोसळला होता . सुदैवाने यामध्ये कसल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. आजही शिक्षण विभाग पाण्याची गळती सुरू असलेल्या कार्यालयात कार्यरत आहे.
सदर संपूर्ण इमारत जिर्ण झालेली असून चक्क गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात कामकाज करण्याच्या टेबलावर पाण्याच्या बादल्या संरक्षणासाठी ठेवण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकारी हे पाऊस सुरू असताना आपल्या कार्यालयात बसु शकत नाहीत. त्यांना सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयीन टेबलावर बसुन कामकाज करावे लागत आहे. सदर इमारतीच्या छताच्या सिमेंट उखडून निघाला आहे. शिक्षण विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन नाईलाजाने कार्यालयीन कामे करावी लागत असल्याची खंत येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपल्या कामानिमित्त येत असतात. सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू पाण्यापासून बचावासाठी चौपटीत आसरा घेतात. पंचायत समिती येथील संपूर्ण कार्यालयाचे छत कोसळत असल्याने मोठी दुर्घटना होऊन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्या कडे प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष देऊन पंचायत समितीचे सर्व कार्यालय स्थलांतरित करावे अशी मागणी जोर धरत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत