वाढीव वीज दर कमी करा : आम आदमी पक्षाचि मागनी
वाढीव वीज दर कमी करा : आम आदमी पक्षाचि मागनी
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शशिकांत बतकमवार,सिन्देवाही : विजेच्या दरात वाढविण्यात आलेला अधिभार कमी करणे,30% स्वस्त विज देणे,विज कंपन्याचे सीएजी ऑडिट करणे,दिल्ली व पंजाब प्रमाने 200 युनिट वीज मोफत देणे इत्यादी मागण्याचे निवेदन आम आदमी पार्टी सिदेंवाही कडून तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
111111111111111
महा विकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नव्याने आलेल्या भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये सत्ता स्थापन झाल्याबरोबर वीज वितरण कंपनीने वीज दरात भरगोस वाढ करत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. हे विजेचे दर लवकरात लवकर कमी करावे यासाठी आम आदमी पक्ष सिंदेवाही यांच्या कडून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार सिन्देवाही यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
11111111111111
100 पेक्षा जास्त वीज वापरल्यास 50 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल तथा घरगुती वीज दरामध्ये सुद्धा दोन रुपये प्रति युनिट प्रमाणे वाढ केली गेली आहे. एका बाजूला बेरोजगारी आणि लोकांचे उत्पन्न कमी आहे दुसरीकडे सामान्य वस्तूंची महागाई यामुळे राज्यातील जनता आधीच त्रस्त झाली असून वीज वितरण कंपनीचा हा निर्णय नागरिकांसाठी जीवघेणा सिद्ध होणार आहे आपल्याच राज्यात कमीत कमी पैशात वीज निर्मिती होत असून आपल्याला इतर राज्याच्या तुलनेत महाग वीज विकत घ्यावे लागत आहे हेच मुळात लाजिरवाणी गोष्ट आहे या आधीच्या महा विकास आघाडीने 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे व त्यापुढील वीजेचे दर निम्मे करण्याचे आश्वासन दिले होते. त्या निर्णयास सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व तेव्हाचे विरोधी पक्षनेते त्यांनी पाठिंबा दिला होता व मुद्दा उचलून धरला होता.
1111111111111111
आम आदमी पक्षाचे सरकार असलेल्या पंजाब मध्ये 1 जुलै पासून 200 युनिट वीज मोफत देत आहे. तसे दिल्लीमध्ये 2015 पासून 200 युनिट वीज मोफत देऊन ही त्यांचा महसूल नफ्यात आहे, तर महाराष्ट्र सारख्या संपन्न राज्य सरकारला हे शक्य नाही का? हाच सर्वसामान्यांचा मुद्दा लक्षात घेऊन आज आम आदमी पक्ष सिंदेवाही तर्फे आज तहसीलदार सिंदेवाही यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले यावेळी आम आदमी पक्षाचे मनोहर पवार,अमन पटेल,विलास गंडाटे,तुषार खंडारे,विध्या धुळेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत