Breaking News

गोवरी येथे चिमुकल्यांनी राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन

 गोवरी येथे चिमुकल्यांनी राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन

लक्ष्मीबाई लोहे कॉन्व्हेन्टचा प्रेरणादायी उपक्रम...

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी प्रविण चिडे, विरूर : रक्षाबंधन म्हणजे बहीण_भावाच्या पवित्र नात्याच्या, प्रेमाचा,जिव्हाळ्याचा अनमोल क्षण.रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधत असते.भाऊ म्हणजे जणूकाही बहिणीच्या रक्षणाचे प्रतीकच.रक्षाबंधनाचा सण सर्वत्र साजरा होत असताना गोवरी येथील लक्ष्मीबाई लोहे कॉन्व्हेन्टने शिक्षकांच्या कल्पकतेतून,

 चिमुकल्या विद्यार्थ्यांना राखी बांधण्याचा एक अनोखा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित संस्थापक निखिलेश लोहे यांचे मार्गदर्शनात ३० चिमुकल्या विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.यावेळी शिक्षिका रीना रणदिवे, शितल काळे,अश्विनी निखाडे,सुनीता कोवे उपस्थित होते.चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राखी बांधल्याने शाळेत बहीण_भावाप्रती असलेले प्रेमाचे नाते अधोरेखित झाले आहे.त्यामुळे शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांना राखी बांधून राबविलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत