विरूर स्टेशन ग्रामपंचायत तर्फे हर घर झेंडा मोहिमे अंतर्गत गावकऱ्यांना केले राष्ट्रध्वज वाटप
विरूर स्टेशन ग्रामपंचायत तर्फे हर घर झेंडा मोहिमे अंतर्गत गावकऱ्यांना केले राष्ट्रध्वज वाटप
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे,विरुर : भारत सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या हर घर झेंडा हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील वीस कोटी होऊन अधिक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरघर तिरंगा मोहीम सुरू केली गेली त्या अंतर्गत विरूर स्टेशन ग्रामपंचायत यांनी सहभाग घेऊन गावकऱ्यांना राष्ट्रध्वज वाटप केले जात आहे.
राष्ट्रध्वज कसा लावावा आपल्या हातून तिरंगा लावताना कोणतीही चूक होऊ नये राष्ट्रध्वजाच्या कोणताही प्रकारे अपमान होऊ नये त्यासाठी काळजी घेतली जावी योग्यरीत्या राष्ट्रध्वज लावण्यात यावे यासाठी सगळ्यांना मार्गदर्शन करून सरपंच मॅडम कुमारी भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रध्वज विरु्र वासियांना वाटप करण्यात आले देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण होत असून अमृत महोत्सव साजरा करण्याकरिता प्रत्येक घरा वरती झेंडा लावण्यात यावा
याकरिता राष्ट्रध्वज वाटप करण्या करिता मा. सरपंच मॅडम भाग्यश्री आत्राम श्री श्रीनिवास इलनदुला उपसरपंच रवींद्र कुडमेते सदस्य विलास मेश्राम सदस्य अर्चना कस्तुरवार सदस्य आशाताई चांदेकर लिलाबाई गेडाम ज्योतीताई,इलंदुल्ला महेंद्र उपरे सत्यपाल उपरे नंदकिशोर मोरे यादी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविका उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत