Breaking News

बोदवड नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे आज एक तास कामबंद आंदोलन

 बोदवड नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे आज एक तास कामबंद आंदोलन, मारहाणीचा निषेध

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, जळगाव : बोदवड येथील नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण यांना कार्यालयाच्या गेटबाहेर मारहाण झाली. त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी २६ रोजी कामगार संघटनेच्या वतीने बोदवड नगरपंचायतीचे कर्मचारी, सकाळी १० वाजेपासून एक तास कामबंद आंदोलन करणार आहेत. यासंदर्भातील निवेदन नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी उपेक्षित दलित सामाजिक परिषदतर्फे सादर केले. निवेदनावर मनोज छपरीबंद यांची स्वाक्षरी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत