Breaking News

ग्राम पंचायत सातारा भोसले येथील पांदन रस्त्याची दुरवस्था

 ग्राम पंचायत सातारा भोसले येथील पांदन रस्त्याची दुरवस्था

शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता मोठे संकट

महा घडामोडी न्युज, तालुका प्रतिनिधी, गणेश परचाके,पोंभूर्णा : पावसामुळे सातारा भोसले ग्रामपंचायत अंतर्गत सातारा तुकून परिसरातील अनेक गावातील शेतशिवारात जाणाऱ्या पांदण रस्त्याची दैनावस्ता झाली आहे. शेतात जायचे कसे असा मोठा संकट प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सातारा भोसले ग्रामपंचायत सातारा तुकुम गावातील शेत पांदण रस्ते पावसामुळे चिकलमय झाले आहेत. 

एन हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी बियाणे खते शेतातील झोपडीत नेऊन ठेवतात मात्र शेतीच्या हंगामापासून शेतकऱ्याचा माल घरात येईपर्यंत याच चिखलमय पांदण वाहून गेलेले रस्ते त्यास शेतकऱ्यांना रस्त्यावरून कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबविते मात्र ग्रामीण भागात योजनाची पायमल्ली होत आहे. अनेक वर्षापासून पांदण रस्त्याची स्थिती जैसे थे आहे. यात प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. पावसाने पांदण रस्ता खराब झाला आहे. 

मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने व बांधन रस्ता पाण्याच्या अभावाने फुटल्याने शेतीला कामासाठी मजूर व खत बैलबंडी नेताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास करावा लागत आहे. त्यामुळे पांदण रस्त्याचे खडीकरण करण्याचे गरज आहे .सातारा भोसले ग्रामपंचायत यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याचे दुरवस्था बघून सचिव सरपंचाने सातारा तुकून परिसरातील नागरिकांची मागणी लवकरात लवकर करावी अशी व्यक्त नागरिकांनी सांगितली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत