क्रांती दिनी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा रॅली
क्रांती दिनी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा रॅली
.. नगरपंचायतचा उपक्रम,विद्यार्थ्यांचा भर पावसात उत्स्फूर्त प्रतिसाद
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष रोकडे, अर्जुनी मोरगाव : देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.शासनाने अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान उत्साहात साजरा करण्याचे जनतेला आव्हान केले आहे.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नगरपंचायत अर्जुनीच्या वतीने क्रांतीदिनी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नगरपंचायत उपाध्यक्ष ललिता टेंभरे, सभापती दाणेश साखरे व संजय पवार,ठाणेदार सोमनाथ कदम,पूर्व सैनिक सेवा परिषदेचे प्रभाकर पुस्तोडे,प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव,स्वाती तायडे, डॉ.गजानन डोंगरवार,लुणकरन चितलंगे उपस्थित होते.
स्थानिक दुर्गाचौकातून तिरंगा रॅलीची सुरुवात झाली.रॅलीमध्ये शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.भर पावसात राष्ट्रभक्तीची प्रचिती विद्यार्थ्यांच्या उत्साहातून आली.हातात तिरंगा,मुखात भारत माता की जय च्या घोषणांनी शहर दणाणले.शहरातील मुख्य मार्गांनी ही तिरंगा रॅली मार्गक्रमण करीत सहिद स्मारक स्थळी पोहोचली. स्वातंत्र्य संग्रामात ज्या शहिदांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले,त्या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तिरंगा रॅलीमध्ये पोलिस पथक,पूर्व सैनिक सेवा परिषद आणि जिल्हा परिषद हायस्कूल,सरस्वती विद्यालय, न्यु मून कॉन्व्हेंट,बहुद्देशीय हायस्कूल,शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विर शहिदांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.संचालन आणि आभार प्रा.इंद्रनील काशीवार यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शाळा, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी,नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा गैरहजर
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त क्रांतीदिनी नगरपंचायत ने तिरंगा रॅलीचे आयोजन केले.मात्र आयोजन प्रमुख नगरपंचायतच्या मुख्याधिकारी शिल्पारानी जाधव आणि नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे या कार्यक्रमाला गैरहजर असल्याच्या चर्चा कार्यक्रम स्थळी ऐकू येत होत्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत