Breaking News

आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली वतीने क्रांतिदिन व जागतिक अदिवासी दिन साजरा

 आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली वतीने क्रांतिदिन व जागतिक अदिवासी दिन साजरा

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,गडचिरोली : क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून स्थानिक शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे शहीद बिरसा मुंडा व क्रांतिवीर भगत सिंग यांच्या प्रतिमेला आपचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या हस्ते प्रतिमेला दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. जिल्हा संयोजकांनी क्रांतीविरांच्या जीवनावर प्रकाश टाकला ,प्रत्येकांनी क्रांतीविरांचे विचार आत्मसात करावे व आपल्या जीवनात आमुलाग्र बदल घडवावे असे मार्गदर्शन करण्यात आले. 

त्यावेळी आपचे सचिव भास्कर इंगळे,कोषाध्यक्ष संजय जीवतोडे ,संघटनमंत्री डॉ देवेंद्र मुंघाटे,शहर संयोजक कैलास शर्मा, प्रमोद वाटे,विलास खांडेकर, नामदेव पोले,संतोष कोटकर, समिता गेडाम,सोनल ननावरे,मीनाक्षी खरवडे,अल्का गजबे, भास्कर आत्राम,मनोज गोलदार,पुरुषोत्तम बांबोळे, शुभांगी मरघडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत