बेल्यातील नवीन ठाणेदारांसमोर अवैध धंदे रोखण्याचे आव्हान
बेल्यातील नवीन ठाणेदारांसमोर अवैध धंदे रोखण्याचे आव्हान
बेल्यासह 70 ते 80 गावांतील अवैध धंद्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त ठाणेदारांसमोर
महा घडामोडी न्युज नेटवर्क,नागपूर : बेल्याचे ठाणेदार पंकज वाघोडे यांची नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नवीन आलेले ठाणेदार म्हणून अजित कदम यांनी ७ ऑगस्ट रोजी पदभार हाती घेतला. बेल्यासह ६० ते ६५ गावांतील अवैध दारू वाहतूक व विक्री, जुगार, मटका या अवैध धंद्यांना आळा घालण्याचे फार मोठे आव्हान नवनियुक्त ठाणेदारांसमोर आहे.
नवीन ठाणेदार अजित कदम यांनी आपले सिंघम रूप दाखून या अवैध धंद्यांचा नायनाट करावा व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास प्रारंभ करावा आणि जनतेला दाखून घ्यावे पोलिस प्रशासन जनतेच्या हिताचे आहे. बेला पोलिस ठाण्यांतर्गत १०० गावांच्या जवळपास कार्यक्षेत्र आहे.
या ठाण्यात कर्तव्यदक्ष ठाणेदाराची नियुक्ती शासन करीत असते.. परंतु, मागील दीड दोन वर्षात बेला परिसरात अवैद्य धंदे, दारूचा महापूर, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना सोनेगाव बेला सिर्सी मार्गे बिनधास्तपणे दारूची वाहतूक, सिस येथे अवैधरित्या कोळशाची साठवणूक व विक्री, टेम्पो ट्रॅक्स ट्रक मालक व रेतीच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या लोकांकडून महिन्याचे टार्गेटमुळे उलटसुलट चर्चा रंगत होत्या. बेला बिटच्या पोलिस हवालदारावर ठाण्यांतर्गत येणाऱ्या संपूर्ण बिटमधील चौकशी आणि वसुली यासारख्या कामावर आळा घालावा लागेल.
पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक फिर्यादी आणि आरोपीकडून पैसे घेण्याच्या धंद्याना आळा घालण्याचे काम नवीन ठाणेदारासमोर आव्हान ठरणार आहे. संदीप लीलाधर बराडे या युवकाने केलेल्या आत्महत्या प्रकरणी फिर्याद देण्याकरिता गेलेल्या फिर्यादी व सोबत असलेल्या काही युवकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून फिर्यादीवरच आरोपाचा भडका उडवला.
जर हे असेच सुरू राहिले तर युवापिढी सोबत अनेक घरे उद्ध्वस्त होतील व रसातळाला जातील, अशी भीती येथील सुजाण नागरिक व्यक्त करीत आहे. याकडे नवीन ठाणेदार अजित कदम आणि वरिष्ठांनी त्वरित लक्ष घालण्याची गरज असून, अवैध धंद्यांना पूर्णपणे पूर्णविराम द्यावा, हीच मागणी बेल्यातील नागरिक, पत्रकार मंडळी यांची आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत