विष प्राशन करून युवकाचा मृत्यू,ऊसगाव येथील घटना
विष प्राशन करून युवकाचा मृत्यू,ऊसगाव येथील घटना
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : लाखनी पोलिस ठाण्याचे हद्दीतील ऊसगाव येथे विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार(ता.२६) रोजी रात्री ११:०० वाजता दरम्यान उघडकिस आली. मृतकाचे नाव दुर्गेश ईश्वर गजबे(२४) रा. ऊसगाव, तालुका साकोली असे आहे.
मृतक दुर्गेश गजबे आपले कुटुंबासह ऊसगाव येथे वास्तव्यास असून मोलमजुरीचे काम करून कुटुंबाचा गाडा चालवीत असे. पोळ्याचे दिवशी त्याने विषारी औषध प्राशन केल्याचे कुटुंबीयांचे लक्षात आल्याने त्याला उपचाराकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णालय पोलिस चौकीतील पोलिस हवालदार दहीवले यांनी सर्व सोपस्कार आटोपून मृतदेह उत्तरीय परिक्षणाकरिता पाठविले.
तथा मर्ग क्रमांक ००/२०२२ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन घटनास्थळ लाखनी पोलिस ठाण्याचे हद्दीत असल्यामुळे केस डायरी लाखनी पोलिसांकडे पाठविण्यात आली. लाखनी पोलिसांनी मर्ग क्रमांक ४५/२०२२ अन्वये नोंद घेतली. उत्तरीय परिक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. त्याचेवर स्थानिक स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कलम १७४ सीआरपीसी नुसार पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास पोलीस हवालदार दिगंबर तलमले करीत असले तरी मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत