Breaking News

नारायणगव्हाण चौपदरीकरणाचे खासगीकरणांतर्गत होणार भूसंपादन

 नारायणगव्हाण चौपदरीकरणाचे खासगीकरणांतर्गत होणार भूसंपादन

सार्वजनिक बांधकामकडून प्रस्ताव भूसंपादन विभागाकडे कार्यवाहीसाठी सादर

भूसंपादनाचा योग्य मोबदला जागा मालकांना मिळून देण्यासाठी पाठपुरावा करणार~शरद पवळे

 नारायणगव्हाणसह नगर-पुणे महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी महमार्गावर अवजड वाहनांच्या वेगाची मर्यादा,अर्धवट व निकृष्ट दर्जाची कामे, दारू पिवुन वाहने चालवण्यासह रस्ता सुरक्षेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम, महसुल, राज्य उत्पादन शुल्क, पोलिस प्रशासन,भूसंपादन, भूमिअभिलेख संबंधित सर्व अधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्या संदर्भात सार्वजनिक बांधकामचे एस बी बि-हारे यांच्याशी पत्र स्विकारतेवेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,दत्ता ठूबे, पारनेर : नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण अरुंद धोकादायक रस्त्याची प्रलंबीत लांबी ९४५ मीटर होती नाराणगव्हाण ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटनांच्या लढ्यामुळे , प्रसिद्धी माध्यमांच्या सहकार्यामुळे ८१५ मीटर अंतर पुर्ण करण्यात यश आले असुन त्यापैकी १३० मीटर चौपदरीकरणासाठी सार्वजनिक बांधकामकडून भूसंपादनासाठी समन्वयक अधिकारी भूसंपादन विभाग जिल्हाधिकारी कार्यलय अहमदनगर यांच्याकडे कार्यवाहीसाठी नव्याने सादर केलेल्या प्रस्तावात तालुका भूमीअभिलेख कार्यालयाकडून संयुक्त मोजणी करण्याच्या सुचना देण्यात याव्यात .

व त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आवश्यक शुल्क भरण्यासाठी तयार असुन खासगी वाटाघाटीद्वारे जागा घेण्यास या खात्याची तयारी असून जमिन मोबदला रक्कम रोख स्वरूपात देण्यास सार्वजनिक बांधकामने प्रस्तावात नमूद केले असुन सदर चौपदरीकरण जलद गतीने पुर्ण करण्याच्या दृष्टीने बांधकाम विभाग सदैव प्रयत्नशील राहील असे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी दि.०3/०६/२०२२ रोजी दिलेल्या स्मरण पत्रात नमूद केल्या नुसार महामार्गावर अपघात टाळण्याच्या दृष्टीने देखभाल दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना सुरु केल्या असुन महामार्गाच्या प्रलंबित नारायणगव्हाण चौपदरीकरणाचे काम जलद गतीने पुर्ण करण्यासाठी गावपातळीवर आपले सहकार्य मिळावे असे पत्र उपविभागीय अभियंता एस बी बि-हारे उपअभियंता अहमदनगर यांजकडून सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांना देण्यात आल्याचे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पवळे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत