स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घरोघरी तिरंगा लावण्याचा कार्यक्रम संपन्न
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घरोघरी तिरंगा लावण्याचा कार्यक्रम संपन्न
महा घडामोडी न्युज नेटवर्क, मुंबई : देशाचे पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या आवाहनानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानाअंतर्गत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते श्री.आनंद भैय्या रेखी यांच्या नेतृत्वात आज,गुरूवारी सनराईज सोसायटी, एच.आय.जी, डीडीए फ्लॅट्स, मोतिया खान, राणी झॉंसी कॉम्पलेक्स, न्यू दिल्ली 55 तसेच 144 फ्लॅट योजनेत घरोघरी तिरंगा लावण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला.
सोसायटीचे प्रमुख सी.एस.झंडू यांचे अभियानात बहूमुल्य योगदान लाभले.सोसायटीचे मॅनेजर श्री.अंकित जी तसेच सोसायटीतील इतर उत्साही कार्यकर्ते रामवीर, राजेश, सचिप,रमेश जी यांनी देखील मौल्यवान वेळ देशसेवेसाठी देत पंतप्रधानांच्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देत अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत