Breaking News

वन्सडी कारगाव रस्त्याची दैना अवस्था मुख्यमंत्री सडक योजनेची व्यथा

 वन्सडी कारगाव रस्त्याची दैना अवस्था मुख्यमंत्री सडक योजनेची व्यथा

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,चंद्रपूर : कोरपना जिवती तालुक्याशी जोडणारा व दहा ते बारा गावाचा संपर्क असलेला वन्सडी पिपरडा कारगाव धनकदेवी जिवती हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये मंजूर करण्यात आला या कामाचे उद्घाटन 2021 मध्येच करण्यात आले या कामाकरिता दोन कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला यामध्ये पाच किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण व नऊ मोरयाचे काम आहेत मोरी काम अर्धवट पडले असून वन्सडी गावालगतचे काम अभावी पाणी गावात घुसत आहेे.

 यामुळे गावातील दुर्गंधी वाढण्यास मदत होत आहे तर अनेक ठिकाणी खळीकरणाचे काम अर्धवट असून रस्त्यावर खडीचे ढिगारे लावले असल्यामुळे वाहनाला जाण्या येण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचले आहे हे काम 22 मध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते मात्र कंत्राटदारांनी तुटक तुटक काम केल्यामुळे अनेक ठिकाणी कामे अर्धवट पडलेली आहे ही कामे तातडीने पूर्ण करावी अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत