विरुर स्टेशन येथे शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण बैलपोळा उस्तव साजरा
विरुर स्टेशन येथे शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण बैलपोळा उस्तव साजरा
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : बैल जोडीची पहायला मिळतात वास्तव विरुर स्टेशन येथे ग्राम पंचायतच्या वतीने शेतकऱ्याचा बैलपोळा उस्तव साजरा करण्यात आला बैल जोडीचे सजावट बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा सण असतो वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नागरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते विशेष करून या दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते.
त्या दिवशी बैलांना नाल्यावर किंवा आपल्याच घरी स्वच्छ आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगाच्या वस्त्रांनी सजवले जाते वर्षभर शेतीची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तोरण तोडण्याकरिता बालाजी मंदिर परिसरात आणल्या जाते तिथे गावकऱ्यांच्या वतीने बैलाच्या अंगावरून तीनदा गुडी फिरवल्या जाते
त्यानंतर ती गुढी पुरातन काळातील बालाजी मंदिर येथे येऊन बालाजी मंदिर कमिटी विरुर स्टेशन व गावकऱ्यांच्या वतीने गुढी बालाजी मंदिरात येऊन दर्शन घेतल्या जाते त्या नंतर पूजा अर्चा केली जाते परंपरेनुसार शेतकरी बैल जोडी घेऊन तोरण तोडन्या करिता सज्ज होतो.
काही वेळानंतर तोरण तोडल्या जाते त्यांना ग्राम पंचायत तर्फे त्यांना बक्षीस दिले जाते. या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून गावकऱ्यांकडून काळजी घेतली जाते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सरपंच मॅडम भाग्यश्री आत्राम बालाजी मंदिर कमिटीचे अध्यक्ष सुरेश पावडे. अजय रेड्डी.ज्ञानेश्वर तुराणकर. संगेश पावडे. विलास आकेवार. भास्कर सिडाम. सुधाकर मोरे. प्रविण चिडे. सत्यपाल ताकसांडे. बंडू जिवतोडे.नत्थु मोरे.आनंदराव बोरकुटे.इत्यादी गावकरी शेतकरी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता काळजी घेताना दिसून येतात




कोणत्याही टिप्पण्या नाहीत