Breaking News

प्रहार तर्फे पोळा निमित्ताने बोजारा रूपात थ्रीव्हीलर सायकल,व्हीलचेअर आणि फळं वाटप

 प्रहार तर्फे पोळा निमित्ताने बोजारा रूपात थ्रीव्हीलर सायकल,व्हीलचेअर आणि फळं वाटप

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम, भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुका येथील अनेक गावांत बैलपोळा निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतीने दिव्यांगांना थ्रीव्हीलर सायकल व्हीलचेअर आणि फळं वाटप करण्यात आले, प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा जिल्हा सचिव जयेंद्र देशपांडे यांनी परिश्रम घेवून बैलपोळा निमित्ताने बोजारा रूपात थ्रीव्हीलर सायकल व्हीलचेअर आणि फळं वाटप केले, 

सामाजिक कार्य, आरोग्य, रक्तदान, शासकीय कार्यात सक्रिय सेवा बजावण्यात देशपांडे सदैव असतात तर तालुक्यातील शाखा प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने अनेक कामे करत असतात देशपांडे यांच्या कार्याने जिल्हाध्यक्ष अंकुशभाऊ वंजारी खुश असुन जिल्ह्यातील अनेक कामे करण्याची जबाबदारी देशपांडे यांच्याकडे देत असतात,

    तालुक्यातील सात गावातील दिव्यांगांना एकुण 16 थ्रीव्हीलर सायकल व्हीलचेअर देण्यात आले. यशस्वी ते करिता मंगेश वंजारी रुग्णसेवक, चारू रामटेके,शालिक बोरकर,प्रकाश बन्ते महाराज,जितेन कुंभरे, सोपान झलके,महेश शेलोकर, श्रीकांत वाढई, राजेश डुंभरे, विनोद डोये,बाबुल तवाडे, पिंटू ब्राह्मणकर,राजेश मेश्राम, कटनकर,संतोष फरकुंडे, सतीश कावळे,ने सहकार्य केले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत