Breaking News

रोट्रॅक्ट क्लब बल्लारपूरचा पहिला पदग्रहण सोहळा संपन्न

 रोट्रॅक्ट क्लब बल्लारपूरचा पहिला पदग्रहण सोहळा संपन्न

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : 2022 -2023 या वर्षातील रोट्रॅक्ट क्लब बल्लारपूर चा पहिला पदग्रहण सोहळा रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष रोटेरियन चैतन्य पटेल यांच्या माउंट इंग्लिश मीडियम स्कूल बल्लारपूर येथे 28 ऑगस्ट 2022 ला संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य अतिथी माजी अध्यक्ष रोट्रॅक्ट क्लब चंद्रपूर रोटेरियन केयूर गांधी, रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष रोटेरियन चैतन्य पटेल नूतन सचिव राम तम्पालु . सर्वप्रथम पाहुण्यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.तद्नंतर पुष्पगुच्छ व प्रेमाचे प्रतीक देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले. 

 नूतन सचिव राम तम्पालु यांनी सचिव पदभार स्वीकारला . या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित, रन रागिणी ग्रुप बल्लारपूर, रोट्रॅक्ट सदस्य रोटेरियन गौरव पटेल, मोहित पटेल, अनुज अग्रवाल, भाविक पटेल, जयेश पटेल, महर्षि पटेल, रजत परमार, मिकी शर्मा, शुभम वडगुरे, दीपेश पटेल यश पटेल उपस्थित होते.

मावळते रोटरी क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष रोटेरियन मनीष मुलचंदानी, नवनियुक्त अध्यक्ष प्रफुल चरपे सचिव रोटेरियन महेश कायरकर आनी रोटरी क्लब बल्लारपू चे सदस्य उपस्थित होते.या सोहळ्याचे संचालन रोटेरियन गौरव पटेल यांनी तर आभार प्रदर्शन रोटेरियन मोहित पटेल यांनी केले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत