जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय वाळुंज तर उपाध्यक्षपदी मच्छीन्द्र वाळुंज यांची बिनविरोध निवड
जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय वाळुंज तर उपाध्यक्षपदी मच्छीन्द्र वाळुंज यांची बिनविरोध निवड
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,दत्ता ठूबे, पारनेर : तालुक्यातील अति संवेदनशील समजल्या जाणाऱ्या काकनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अध्यक्षपद तसेच उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध पध्दतीने करण्यात आली. यावेळी मावळत्या समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना निरोप देऊन नवीन सदस्यांची पुनररचना करण्यात आली. अध्यक्षपदी दत्तात्रय जबाजी वाळुंज,उपाध्यक्ष मच्छीन्द्र लक्ष्मण वाळुंज तसेच सदस्य पुढीलप्रमाणे
अर्जुन पोपट वाळुंज,संजय रामदास पवार,अर्जुन सयाजी वाळुंज,विठ्ठल बाळासाहेब वाळुंज,बाळासाहेब भानुदास पवार,सौ तेजश्री संभाजी वाळुंज,सुजाता भगवान वाळुंज,सुलोचना भगवान वाळुंज,वृषाली अनिल वाळुंज,मीरा बबन वाळूंज,जयश्री अविनाश वाळुंज,शीतल संदीप वाळुंज,सायली पुरी यांची नव्याने निवड करण्यात आली.यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना भगवानशेठ वाळुंज म्हणाले यापुढील काळात शाळेचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व्यवस्थापन समिती सर्वोतोपरी मदत करेल.
जिल्हा परिषद शाळा काकनेवाडी साठी यापुढील काळात जे काही योगदान ते आम्ही देऊ तसेच आम्ही देणाऱ्यांमधील आहोत.आम्ही शाळेसारख्या न्याय मंदिरासाठी नेहमी योगदान देत राहू. - अर्जुन पोपट वाळुंज,शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती सदस्य
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांचे आभार योगेश पराजी वाळुंज,संभाजी पोपट वाळुंज,भिकाजी रामदास वाळुंज यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत