Breaking News

सिंधी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत

 सिंधी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : सिंधी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंधी येथे सोमवार दिनांक ०८/०८/२०२२ ला शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून मंगेश घुबडे तर उपाध्यक्षपदी विजय बोबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये प्रीती ढूमने, रंजिता ढूमने, शितल चिलमुलवार, साईनाथ ठमके, बंडु धानोरकर, संजय दामेलवार, वंदना वैरागडे, सुशीला आत्राम, सुनील चौधरी, देवराव ढूमने यांची वर्गप्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. 

 शाळेचे मुख्याध्यापक श्री साईनाथ बुजोने सर यांनी निवड प्रक्रिया व्यवस्थित पार पडली. नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे संरपच शोभाताई रायपल्ले, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, राजकुमार दामेलवार, मंगेश रायपल्ले, मधुकर पाटील धानोरकर, भास्कर भैयाजी मोरे, संजय ढुमणे, गमतीदास मावलीकर, भास्करराव मोरे, विनोद ढुमणे, अमोल झुरमुरे यांनी अभिनंदन केले आहे.शाळेच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव तत्पर असू अशी ग्वाही याप्रसंगी नवनियुक्त कार्यकारिणीने दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत