कृषी सहायक व एका खाजगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक
कृषी सहायक व एका खाजगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, राजुरा : राजुरा तालुक्यातील पोवणी येथील एका कृषी केंद्र संचालकांच्या तक्रारीवरून लाच लुचलूचपत प्रतिबंधक विभागाने कृषी सहायक श्रीमती जया विजय व्यवहारे व राजुरा येथील गणपती कम्युनिकेशन व झेरॉक्स सेंटर चे संचालक वैभव विजय धोटे ह्यांना ताब्यात घेतले आहे,प्राप्त माहीत नुसार पोवणी येथील एका इसमाने आपल्या कृषी केंद्र परवान्यांचे अपडेट करणे व कृषी केंद्र स्थलांतर करण्याच्या कामाकरिता कृषी अधीक्षक कार्यालयातील कृषी सहायक श्रीमती जया व्यवहारे ह्यांच्याशी संपर्क साधला असता,
संबंधिताने ह्या कामाकरिता दहा हजार रुपयांची मागणी केली ,तक्रारदारास संबंधित मागणी मान्य नसल्याने त्याने ह्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात केली,आज प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर लाच कृषी सहायकाच्या वतिने लाच स्वीकारताना राजुरा येथील गणपती कम्युनिकेशन व झेरॉक्स सेंटर चे संचालक वैभव विजय धोटे व कृषी सहायक श्रीमती जया विजय व्यवहारे ह्यांना ताब्यात घेतले असून लाचलुचपत प्रतिबंधक व पोलीस पुढील कारवाई करत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत