Breaking News

हजारे - लंकेना मुगाचा नजराना ....!

 हजारे - लंकेना मुगाचा नजराना ....!

टँकर  घोटाळा प्रकरणी मौन पाळल्यामुळे लोकजागृतीची गांधीगिरी 

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,दत्ता ठुबे, पारनेर : राज्य विधानसभेच्या चालु असलेल्या अधिवेशनात टँकर घोटाळा प्रकरणी चर्चा चालु असताना  पारनेर तालुक्याचे आमदार निलेश  लंके  यांनी कोणतीही भुमिका न घेतल्यामुळे हा घोटाळा उघड करणारी लोकजागृती सामाजिक संस्था यांनी या विषयी नाराजी व्यक्त करत त्यांना   मुगाचे पार्सल पाठवून गांधीगिरी केली आहे .टँकर घोटाळ्यातील आरोपी हे अण्णा हजारे यांच्या गावातील असून त्यांचे सहकारी आहेत . त्यांनीही याप्रकरणी गेल्या सहा महिन्यांपासूनमौन बाळगले आहे, त्यामुळे त्यांनाही मुग भेट म्हणून पाठवण्यात आले आहेत . ग्रामीण भागात एखाद्या विषयावर काहीही न बोलणाराला   तुम्ही मुग गिळले काय ? अशी म्हण प्रचलित आहे .  याचाच आधार घेऊन लोकजागृती सामाजिक संस्थेने आमदार लंके व हजारेंना मुगाचे पार्सल सप्रेम भेट पाठवले आहे .

   

पारनेर तालुक्यात सुमारे १०२ कोटी रुपयांचा टॅकर घोटाळा  उघड झाला . हा घोटाळा लोकजागृती सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयाच्या मदतीने उघड केला आहे . गेल्या  मार्चमद्ये पन्नास  लाखांच्या वन विभागाचा घोटाळा प्रकरणी  विधानसभेत  लक्षवेधी मांडणारे आमदार लंके यांनी टँकर घोटाळा प्रकरणी मात्र काल मौन पाळले होते . विधानसभेत आवाज उठवण्याची मागणीही  लोक जागृतीने केली असताना या विषयी त्यांनी चकार शब्द काढला नव्हता . या प्रकरणातील  टँकर घोटाळेबाजांना पाठीशी घालुन आमदार महोदयांनी निवडणुकीतील भांडवल पुरवठादारांच्या उपकाराची परतफेड केल्याचा आरोप लोकजागृतीचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी आमदार लंके यांच्यावर केला आहे .  दि .२२ ऑगस्ट २०२२ रोजी विधानसभेत  टॅकर घोटाळ्याशी संबंधीत चर्चा झाली .

बीडचे आमदार संदिप शिरसागर , धनंजय मुंडे , नाशिकचे एक  आमदार यांनी या प्रकरणी मंत्री गुलाबराव पाटील यांना धारेवर धरले . परंतु यावेळी पारनेरचे आमदार महोदयांनी मात्र मौन बाळगणे पसंत केले .माझ्या पारनेर  तालुक्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे एवढे सुध्दा सत्य सभागृहाला सांगावे  वाटले नाही पारनेर साखर कारखाना सहा महीन्यात शेतकऱ्यांचा करणार अशी गर्जना करणारे लंके यांनी कारखाना बचाव समितीला धोका दिला . पारनेरला भव्य दवाखाना उभारण्यासाठीच्या जागेला तिथे विरोध झाला असताना पारनेर कारखान्यावर उपलद्ध जागा देण्याच्या बचाव समितीच्या प्रस्तावाला आमदार लंकेंनी केराची टोपली दाखवली . हा प्रस्ताव चांगला ,बरा -वाईट  काहीही प्रतिक्रीया कळवण्यात आली नाही .त्यामुळे  पारनेरची मोक्याची जागा हडपण्यासाठी तर हा आटापिटा नाही ना या पारनेरकरांच्या  शंकेला  पुष्ठी मिळत असल्याचाही  आरोप करण्यात आला आहे . 

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा देशभर डांगोरा पिटणारे 

थोर समाजसुधारक तथा माहीती अधिकाराचे जनक अण्णा हजारे  यांनाच आता माहीती अधिकाराची अॅलर्जी झाली आहे . कारण  त्यांच्या सहा   संस्था यांची माहीती अपिल करून देखील देण्यात आली नाही. आता राज्य माहिती आयोग यांच्याकडे  अपिल दाखल करण्यात आले आहे . त्यामुळे त्यांच्या पारदर्शकतेची व  प्रामाणिकपणाची आता कीव  येत असल्याची भावना लोकजागृतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली . त्यामुळे आम्ही आमच्या भावना त्यांचेपर्यंत पोहचवण्यासाठी  त्यांना हा नजराना भेट स्वरूपात पाठवत असल्याचे सांगण्यात आले . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत