Breaking News

काकणेवाडी येथे झालेल्या विकास कामांमध्ये मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार

 काकणेवाडी येथे झालेल्या विकास कामांमध्ये मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार

 सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार यांचा आरोप चौकशी न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दत्ता ठुबे, पारनेर : तालुक्यातील काकणेवाडी येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात विकास कामे झाली असून ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची असून त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप अन्याय निर्मूलन समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार यांनी केला आहे. या संदर्भातील पत्रव्यवहार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचेकडे केला असुन यांच्याकडून चौकशी झाली असून सर्व संबंधित ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 

आतापर्यंत काकणेवाडी गावामध्ये जेवढा निधी उपलब्ध झाला ती सर्व कामे निकृष्ट दर्जाची झालेली असून या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे,या कामांमध्ये गावची वेस, राष्ट्रीय पेयजल योजना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विकास कामे, गावची शौचालय योजना तसेच राम मंदिरापुढील व सभागृहात पेवब्लॉक बसवणे यामधील भ्रष्टाचार तसेच अंगणवाडी समाविष्ट आहे. या सर्व कामांची बिले काम होण्याच्या अगोदरच संबंधित ठेकेदारांनी काढून घेतली आहेत असा आरोप राहुल पवार यांनी केला आहे. याला संबंधित ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक तसेच ठेकेदार जबाबदार असून यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याची माहिती राहुल पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत