प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कनिष्ठ अभियंता,उपविभागीय अधिकारी,यांनी घेतली सरपंच भाग्यश्री आत्राम यांची भेट
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कनिष्ठ अभियंता,उपविभागीय अधिकारी,यांनी घेतली सरपंच भाग्यश्री आत्राम यांची भेट
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : वीरूर स्टेशन येथील मुख्य रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे काम संत गतीने चालू असल्यामुळे सरपंच भाग्यश्री आत्राम यांनी मागील आठवड्यात कनिष्ठ अभियंता पुडके व उपविभागीय अधिकारी रामटेके चंद्रपूर यांचेकडे तक्रार करून नाराजी व्यक्त केली होती, त्यांची दखल घेऊन कनिष्ठ अभियंता पुडके, उपविभागीय रामटेके यांनी वीरुर येथे येऊन स्वतः विरूर ते सिंधी या मुख्य रस्त्याची पाहणी करून उद्याला सीमांकन करून कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले.
सरपंच यांनी सिंधी पुलिया बद्दल कनिष्ठ अभियंता पुडके यांच्याशी चर्चा केली असता सिंधी पुलियाचे सर्व बाबी होऊन बरेच दिवस झाले तरी पुलियाचे काम झाले नाही विचारले असता अधिकारी पुडके यांनी पुलिया चे डिझाईनसाठी पाठविण्यात आले तिकडून मान्यता मिळाली तर लवकर लवकर काम करण्यात येईल अशी माहिती सरपंच यांना संबंधित अधिकारी यांनी माहिती देण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत